लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही: हसन मुश्रीफ

कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. | Hasan Mushrif Maharashtra Lockdown

लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही: हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 12:50 PM

कोल्हापूर: राज्यात लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी सरकारची पंचाईत होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करुन फायदा झाला नाही. आता अनलॉकमध्ये नागरिकांना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले. (NCP leader Hasan Mushrif on Maharashtra Lockdown)

ते शनिवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. या लाटेत लहान मुलं विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. दुकानं उघडली की लोकं जीवघेणी गर्दी करतात, ते टाळलं पाहिजे. नियोजन करुन वस्तू खरेदी कराव्यात, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.

चाचण्या वाढवल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवू शकत नाही. राज्यात कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही. मृत्यूची आकडेवारी ही खरीच सांगितली जाते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

‘नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्यानेच कारवाई नाही’

बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.

पथक परतलं

चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे.

संबंधित बातम्या:

‘गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा’

(NCP leader Hasan Mushrif on Maharashtra Lockdown)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.