दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, अपघातात 3 ठार तर तीन जखमी

दोन दुचाकीवरुन सहा जण भरधाव वेगात चालले होते. हाच वेग त्यांच्या जीवावर बेतला. दोन दुचाकी एकमेकींवर धडकल्या आणि होत्याचं नव्हतं झालं.

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, अपघातात 3 ठार तर तीन जखमी
भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दोन जखमीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 10:42 AM

चंद्रपूर : भरधाव वेगात दुचाकी एकमेकींवर धडकल्याने दोन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंपजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना उपचारासाठी गडचिरोली रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत सावी पोलीस ठाण्यात अपघाची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरधाव वेगात दुचाकी एकमेकींना धडकल्या

हरीश पांडुरंग सहारे, सागर रघुनाथ शेडमाके आणि प्रशांत आत्राम अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये अजय विजय गोरडवार, सुमित शेडमाके आणि प्रशांत चावरे यांचा समावेश आहे. व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंपाजवळ काही अंतरावर हा अपघात घडला. दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या. समोरासमोर आल्याने एकमेकींना धडकल्या. सावली पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नवी मुंबईत पाच वाहने एकमेकांवर आदळला

ऐरोली रबाळे येथील अंडरबायपास रोडवर एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने लाईनमध्ये असलेल्या 5 गाड्यांना कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये इर्टिका, रिक्षा, टेम्पो, होंडा सिटी आणि महिंद्रा xuv अशा 5 गाड्यांना जोरात धडक दिली. या अपघातात गाड्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. रिक्षा तर पूर्णपणे चेपली गेली असून, यातील एका पॅसेंजरच्या हाताला दुखापत झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक पोलीस उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.