AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Accident: सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त

धावडवाडीजवळ शेख दाम्पत्य आपल्या चिमुरड्या मुलासमावेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडिका गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद खान शेख(27) व जबीन शेख (25)हे दोघे दाम्पत्य जागेवर खाली कोसळले व अडीच वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला.

Sangli Accident: सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त
सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 8:23 PM

सांगली : जत तालुक्यातील धावडवाडी जवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत अडीच वर्षाचा चिमुरडा ठार (Death) झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी घडली आहे. अब्दुल समद साजिद शेख असे दुर्दैवी चिमुरड्याचे नाव आहे. हेडलाईटला अडीच वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा (Boy) अडकल्याने चालकाने सात किलोमीटरपर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले. अपघातानंतर गावकर्‍यांनी त्या इंडिका गाडीचा पाठलाग करून त्या वाहन चालकाला बेदम मारहाण करत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. महादेव कुंडले असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. यामध्ये साजीद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी (Injured) झाल्याने त्यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Two-and-a-half-year-old boy killed in Indica car and bullet accident in Sangli)

शेख दाम्पत्य बुलेटवरुन शेतात जात असताना घडला भीषण अपघात

साजिद खान नालसाब शेख व जबीन शेख हे दाम्पत्य कामानिमित्त बुलेट गाडीवरून आपल्या अडीच वर्षीय चिमुरड्याला घेऊन धावडवाडी गावात आले होते. धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात. शेख दाम्पत्य आपले काम आटपून शेताकडे जात होते. यावेळी कारचालक महादेव मधुकर कुंडले हा चालक आपली इंडिका गाडी घेऊन मोकाशी वाडी येथील भाडेखोर यांना घेऊन सांगलीकडे निघाला होता. धावडवाडीजवळ शेख दाम्पत्य आपल्या चिमुरड्या मुलासमावेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडिका गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद खान शेख(27) व जबीन शेख (25)हे दोघे दाम्पत्य जागेवर खाली कोसळले व अडीच वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला. हेडलाईटला अडीच वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा अडकल्याने चालकाने सात किलोमीटरपर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले. चोरुची गावानजीक आल्यानंतर त्याला लक्षात येताच त्याने गाडी थांबवून त्या चिमुरड्याला खाली उतरवले. (Two-and-a-half-year-old boy killed in Indica car and bullet accident in Sangli)

इतर बातम्या

Amaravati Poisoning : अमरावतीत सकाळचं जेवण रात्री खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा, चौघांची प्रकृती गंभीर

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून बंदुक रोखली, सहा जणांवर गुन्हा दाखल

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.