Chandrapur Accident : तेरवीचा कार्यक्रम करुन परतत होते पारखी कुटुंब, जनावर आडवे आले अन् …वाचा नेमके काय घडले ?

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील पारखी कुटुंब मोठ्या भावाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे गेले होते. तेरवीचा कार्यक्रम आटोपून सर्व जण गडचिरोली येथे परतत होते. चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथे पारखी यांच्या भरधाव कारसमोर जनावर आडवे आले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली.

Chandrapur Accident : तेरवीचा कार्यक्रम करुन परतत होते पारखी कुटुंब, जनावर आडवे आले अन् ...वाचा नेमके काय घडले ?
चंद्रपूरमध्ये कार अपघातात दोन ठार, सहा जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:46 AM

चंद्रपूर : कारसमोर जनावर आडवे आल्याने वाहन अनियंत्रित होऊन पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघाता (Accident)त दोन जण ठार (Death) झाले तर सहा जण जखमी (Injured) झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथे हा अपघात घडला. किरण पारखी (32) आणि शोभा पारखी (60) अशी मयत महिलांची नावे आहेत. अन्य 6 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे सर्व जण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. रामनगर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (Two killed and six injured in car accident in Chandrapur)

तेरवीचा कार्यक्रम करुन परतत होते पारखी कुटुंब

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील पारखी कुटुंब मोठ्या भावाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे गेले होते. तेरवीचा कार्यक्रम आटोपून सर्व जण गडचिरोली येथे परतत होते. चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथे पारखी यांच्या भरधाव कारसमोर जनावर आडवे आले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली. यात पोलिस कर्मचारी अनिल पारखी यांच्या आई आणि पत्नीचा मृत्यू झाला. तर अनिल पारखींसह 6 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Two killed and six injured in car accident in Chandrapur)

इतर बातम्या

Thane Firing : ठाण्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीकडून कुटुंबावर गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.