Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

शिवधारी यादव यांचा टँकर खराब झाल्याने रस्त्यालगत त्यांनी आपला टँकर लावून टायराला दगड लावण्यासाठी खाली उतरले होते. याच वेळेस अशोककुमार यादव हा आपला टँकर भरगाव वेगात गुजरातच्या लेनवरून जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने उभा असलेल्या टँकरवर जाऊन आदळला.

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:12 PM

विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑईल टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही टँकर चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरार हद्दीत शिरसाड फाटा येथे आज दुपारी साडे तीन वाजता गुजरात लेनवर ही घटना घडली आहे. विरार मांडवी परिक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अशोककुमार आमरजित पाल (48) , शिवधारी हारकू यादव (48) असे अपघातात मृत्यू झालेल्या टँकर चालकांची नाव आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशचे राहणारे असून कामानिमित्त महाराष्ट्रात वास्तव्यास होते.

एका टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

शिवधारी यादव यांचा टँकर खराब झाल्याने रस्त्यालगत त्यांनी आपला टँकर लावून टायराला दगड लावण्यासाठी खाली उतरले होते. याच वेळेस अशोककुमार यादव हा आपला टँकर भरगाव वेगात गुजरातच्या लेनवरून जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने उभा असलेल्या टँकरवर जाऊन आदळला आहे. या अपघातात टँकरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून दोन्ही टँकर चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टँकर अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ACP रामचंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ, यांच्यासह पोलीस हवालदार युवराज जाधव, पो. ना हनुमंत डोईफोडे, पो. कॉ रामदास घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, तात्काळ टँकर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून, मृतदेह हे शवविच्छेदनसाठी पाठविले आहेत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

नंदुरबारमध्येही गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

पिक अप गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे घडली आहे. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जण मजूर असून गोरांबा येथील रहिवासी आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी धडगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर बातम्या

Delhi Crime: जॅकेट परत केले नाही म्हणून मित्राची हत्या, दिल्लीतील धक्कादायक घटना

Pune crime | ‘या’ गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्‍हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...