Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौजमजा करण्यासाठी फिरायला आले, समुद्रात पोहताना खोल पाण्यात गेल्यामुळे दोघांचा मृत्यू

वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघेही नालासोपारा पूर्व परीसरातील संतोषभूवन येथील रहिवासी आहेत.

मौजमजा करण्यासाठी फिरायला आले, समुद्रात पोहताना खोल पाण्यात गेल्यामुळे दोघांचा मृत्यू
Nalasopara boys drown in vasai sea
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 8:14 PM

पालघर : वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अजित मयपाल विश्वकर्मा (वय13 वर्षे) आणि रणजित शिवकुमार विश्वकर्मा (वय 20 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही नालासोपारा पूर्व परीसरातील संतोषभूवन येथील रहिवासी आहेत. (Two young boys of Nalasopara drown in Vasai sea)

मौजमस्ती करताना समुद्रात खोल पाण्यात गेले

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथून 7 ते 8 जणांचा ग्रुप वसईच्या सुरुची बाग येथे फिरायला आला होता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांनी फिरायला जाण्याची योजना आखली होती. यावेळी मौजमस्ती करताना अजित आणि रणजित हे दोघेही पोहण्यासाठी खोल समुद्रात गेले. पोहत असताना या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. पोहत असताना शेवटी हे दोघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले.

उत्तर प्रदेशला जाण्याआधीच दुर्दैवी घटना

ही घटना समजताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि वसई पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बुडालेल्या दोन्ही तरुणांना बाहेर काढले. रणजित विश्वकर्मा हा एका महिन्यापूर्वीच उत्तर प्रदेशवरून घरी आला होता. सोमवारी तो परत उत्तर प्रदेशला जाणार होता. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान, ही घटना घडल्यामुळे दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांच्या जाण्याने नालासोपारा परिसरात शोककळा पसरली आहे.

लातुरात तीन भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री या ठिकाणी ज्ञानोबा जायभाये आणि तुकाराम जायभाये हे दोघे सख्खे भाऊ राहतात. त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. या ठिकाणी असणाऱ्या मन्याड नदीपात्राच्या जवळ त्यांचे शेत आहे. काल नेहमीप्रमाणे दोन भाऊ शेतावर गेले होते. त्यावेळी ते आपल्या तिन्ही मुलांनाही शेताकडे घेऊन गेले.

यावेळी ज्ञानोबा आणि तुकाराम हे दोघे शेतातील काम करीत होते. त्यावेळी ही तिन्ही मुले शेळ्या चरत मन्याड नदीपात्राजवळ आली. तेव्हा त्यांना लाकडाचे ओंडके दिसले. त्यामुळे त्यांना पाण्यात तरंगण्याचा मोह आवरला नाही. शेतात शेळ्या चरत असताना त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून हे तिघेजण पाण्यावर तरंगण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र अचानक त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. या तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

इतर बातम्या :

रायगडमधील JNPT बंदरात DRI ची मोठी कारवाई, 879 कोटी रुपयांचं 293 किलो हेरॉईन जप्त

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

‘दिरंगाई’ हा एमपीएससीचा आवडता ‘उद्योग’, ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवा; अमित ठाकरेंचा संताप

(Two young boys of Nalasopara drown in Vasai sea)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.