तुम्ही साथ द्या, मुंबई पुण्याच्या लोकांना इकडं यावं वाटेल असा हॅपनिंग, प्रगत सातारा बनवू, उदयनराजेंची तरुणाईला हाक

सातारच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी मला साथ द्यावी, मी कायम विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली. या डायलॉगबाजीमुळे युवकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

तुम्ही साथ द्या, मुंबई पुण्याच्या लोकांना इकडं यावं वाटेल असा हॅपनिंग, प्रगत सातारा बनवू, उदयनराजेंची तरुणाईला हाक
उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 7:04 PM

सातारा: राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात इनोवेटीव्ह सातारा उपक्रमांतर्गत तरुणांशी संवाद साधला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातील युवकांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सातारच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी मला साथ द्यावी, मी कायम विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली. या डायलॉगबाजीमुळे युवकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई पुण्यातील लोकांना साताऱ्यात यावं असं वाटेल

आपण पण नेमकं काय करायचे हे ठरवायला आज आपण इथ जमलो आहे. मला माहित आहे करूया, झालं पाहिजे आणि होईल, असं उदयनराजे भोसले म्हणाले. काम करणारे दुसर्‍यावर अवलंबून राहत नसतात आपण कामाला सुरुवात करुया, असं उदयनराजे भोसले म्हणाले. सातारा एवढा हॅपनिंग करून टाकतो की पुण्या-मुंबईचे लोक साताऱ्यात आले पाहिजेत, फक्त तुमची साथ पाहिजे, असं आवाहन त्यांनी सातारकर तरुणाईला केलं.

सातारकरांना कानपिचक्या

सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य माहित आहे का? कोणालाही विचारा कसा आहेस?विचारलं तर उत्तर निवांत हे येतं. निवांत कधी असावं ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल, असं उदयनराजेंनी म्हणत सातारकरांच्या कानपिचक्या घेतल्या.

विरोधकांवर निशाणा

मागील चार वर्षात सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामं करून दाखवली का नाही असा सवाल विचारला जात होता. ग्रेड सेपरेटर बनवताना खोदून ठेवलेल्या कामाबाबत आमदार शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले खोदून ठेवल्याशिवाय कामे कशी होणार आहेत. कामाला उशीर का लागला यावर टीका होते. प्रत्येक गोष्टीला प्रपोजल तयार करावे लागते. पाठ पुरावा करावा लागतो आणि मग ही विकास कामे होत असतात. उदयनराजे म्हणाले जन्माला येणाऱ्या बाळाला देखील नऊ महिने लागतात.मी काही देव नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

फेमस डायलॉगनं भाषणाचा शेवट

हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू हा लोकांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे हा आहे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मै अपनी खुद की भी नही सुनता, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमातील भाषणाचा शेवट केला.

इतर बातम्या:

VIDEO | मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत, शिवेंद्रराजेंच्या ‘दुचाकी’ टीकेवर उदयनराजेंचा भडका

Video: उदयनराजे भोसलेंकडून युवकांना व्यायामाचे धडे, साताऱ्यात विकासकामांचा धडाका सुरुच

Udayanraje Bhonsle said letus work for develop Satara with Innovative Satara forum

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.