शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन काम करणार का? उदयनराजेंचं तीन शब्दात उत्तर, साताऱ्यात नेमकं काय घडणार?

साताऱ्यातील विकासकामांबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना सोबत घेऊन काम करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhonsle) जनता माझ्या पाठीशी असल्याचे उत्तर देत शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा संकेत दिले आहेत.

शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन काम करणार का? उदयनराजेंचं तीन शब्दात उत्तर, साताऱ्यात नेमकं काय घडणार?
शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 11:29 PM

सातारा: साताऱ्यातील विकासकामांबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना सोबत घेऊन काम करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhonsle) जनता माझ्या पाठीशी असल्याचे उत्तर देत शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमधील मतभेद नगरपालिकेच्या निवडणुकी आधीच दिसू लागले आहेत. उदयनराजे भोसले हे सातारा नगरपालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन करत आहेत. उदयनराजे पत्रकारांना विकास कामांची माहिती देत असताना पत्रकारांनी राजेंना आमदार शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन काम करणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयाला बगल देत जनता माझ्या पाठीशी असल्याचे विधान केल आहे. यावरून दोन्ही राज्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. उदयनराजे भोसलेंच्या या भूमिकेमुळं साताऱ्याच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे स्पष्ट होतं आहे.

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंची सत्ता

सातारा नगरपालिकेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत मतदारांतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. 2016 च्या निवडणुकीत देखील मनोमिलन तुटलं होतं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून नवख्या माधवी कदम यांना संधी देण्यात आली होती. तर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून वेदांतिकाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. माधवी कदम यांच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले यांनी सातारा ढवळून काढला होता. अखेर माधवी कदम विजयी झाल्या. तर, सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले होते. तर, भाजपचे 6 नगरसेवक त्या निवडणुकीत विजयी झाले होते. नगरविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या.

साताऱ्यात तिरंगी लढतीची शक्यता

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे साताऱ्यात आता दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्या निवडणूक लढवतील. साताऱ्यात गेल्यावेळी निवडून आलेले भाजप नगरसेवक कोणत्या आघाडीच्या बाजूनं जाणार हे पाहावं लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्यातरी सातारा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

सातारा विकास आघाडी शब्द पाळते

सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो असा खोचक टोला त्यांनी नगरविकास आघाडीला म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला होता. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे की तिने केलेल्या कामाचं जाहीरपणे ऑडिट बोर्डवर लावले होते असं म्हणतं केलेल्या कामाचा पाढा उदयनराजेंनी माध्यमांसमोर वाचला होता.

इतर बातम्या :

शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही, पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही काहीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे

साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा

Udayanraje Bhonsle said People of satara support him gave signal to not alliance with Shivendraraje Bhosale for Satara Municipal Election

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.