VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली. चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरश: रडू कोसळलं.

VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या
Urmila Matondkar
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 5:37 PM

रत्नागिरी : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली. चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरश: रडू कोसळलं. टीव्ही 9 मराठीने दाखवलेली व्यथा पाहून, ज्या कुटुंबापर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं, त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी मदत केली. उर्मिला मातोंडकर यांनी या कुटुंबाला रोख रक्कम देऊन मदत केली.

यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकरांचा हुंदका दाटला. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “सध्याची परिस्थिती पाहाता, कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. टीव्ही 9 मुळे आम्ही इथे पोहोचलो. मी प्रार्थना करते, टीव्ही 9 असो किंवा अन्य मीडियामुळे लोक इथे पोहोचतील. हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही. मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलंय, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिलंय, माझ्या परीने ते पूर्ण करेन, अजून काय करु, असं म्हणत उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडायला लागल्या.

टीव्हीवर महाप्रलय पाहून कोलकात्यावरुन कोकणात

चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं. त्यावेळेला मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवले आपण कोकणात मदत घेऊन जायचं. कोकणवासीयांना मदत करायची. कोकणातील चिपळूणची परिस्थिती खूप भीषण आहे. मात्र कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पोहोचल्यावर सांगितलं होतं.

VIDEO : उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर

संबंधित बातम्या

VIDEO : देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले, निवारा छावणीतच जेवले!

VIDEO | आधी मुख्यमंत्र्यांसमोर आता उदय सामंतांसमोर, स्वाती भोजनेचा आमदार, खासदारांचा पगार फिरवण्याची मागणी कायम, कार्यकर्तेच नाही, मंत्र्यांनीही हात जोडले

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.