वैभव नाईक यांची राणे कुटुंबीयांवर टीका, म्हणाले, राणे कुटुंबीयांना…
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते
सिंधुदुर्ग – ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक महाप्रबोधन यात्रेत बोलत होते. वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्र तोडण्याचा डाव भाजपनं आखला आहे. राज्यपालांनी अनेक वेळा शिवरायांचा अपमान केला. भाजपचे प्रवक्तेही शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचं काम करत आहेत. संयुक्त महाराष्ट्रात कोकणचा वाटा मोठा होता. उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीविषयी बोलत होते. त्यामुळं भाजपनं डाव साधला. सत्ता हिसकावून नेली, असा आरोप वैभव नाईक यांनी लावला.
वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेची फूट सिंधुदुर्गात पडली. शिवसेना पुन्हा उभी करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज यायला लागला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. परंतु, अशा कारवाईला शिवसेना भिक घालणार नाही, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. राणे कुटुंबीयांनी गेल्या अडीच वर्षांत टीका केल्याशिवाय दुसरं काही केलं नाही.
वैभव नाईक म्हणाले, आम्हाला कोणाचीही भीती नाही. त्यामुळं येत्या काळात आम्ही पुन्हा उभं राहू. कोरोना काळातील उद्धव ठाकरे यांच काम आठवा. उद्धव ठाकरे यांच्यामुळं महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला.
उद्धव ठाकरे यांच्यामुळं येथे शासकीय मेडिकल कॉलेज मिळालं, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाचा गौरवही त्यांनी केला.
संघर्ष करण्यासाठी नव्यानं पुन्हा सुरुवात झाली. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.