मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीची लाट (Weather Alert) आली आहे. राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. यामुळे राज्यात चाैका-चाैकामध्ये शेकोट्या करून या गुलाबी थंडीचा नागरिक आस्वाद घेत आहेत.
सांगलीमध्ये गुलाबी थंडी चाैका-चाैकामध्ये शेकोट्या
सांगलीत गेल्या चार दिवसांपासून थंडी चांगलीच वाढली आहे. वातावरणातील पारा घसरत आहे. त्यामुळे सांगलीकर गारठले आहेत. वातावरणात कमालीची थंडी सुरू झाली आहे. रात्रीपासून ते सकाळपर्यंत थंडीचा जोर कायम रहात असल्याने सांगलीकर मात्र गारठून गेले आहेत. गेल्या चार दिवसापासून सांगलीत थंडीचा जोर वाढत आहे. अशा स्थितीत सुद्धा काही हौशी सांगलीकरांनी मात्र या गुलाबी थंडीचा पुरेपूर आस्वाद घेत असून या थंडीमध्ये सकाळी व्यायाम करत आहेत.
भंडाऱ्यामध्ये 9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद
राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेने भंडारा जिल्ह्यात पारा घसरला असून 9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मागील तीन दिवसांपासून पारा सतत घसरत असून आज 9 डिग्री वर तापमान पोहचले आहे. पुढील तीन दिवस ही तापमनात घसरण होण्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये राज्यामध्ये हुडहुडी मात्र कायम आहे.
संबंधित बातम्या :
Pune | पुण्यातील रानगव्याच्या मृत्यूची दखल; उच्च न्यायालयाची वन आणि पोलीस खात्याला नोटीस