मातोश्रीवर बँगा पोहचवेल, त्यालाच तिकीट; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे गटावर मोठा आरोप

Nitesh Rane Attack on Udhav Thackeray : नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे पक्षाचे तिकीट विकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. उबाठा मध्ये जी बंडखोरी सुरु आहे त्याच कारण हेच आहे जो मातोश्रीकडे बॅगा पोचवेल त्याला तिकीट देण्यात येत असल्याचे राणे म्हणाले.

मातोश्रीवर बँगा पोहचवेल, त्यालाच तिकीट; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे गटावर मोठा आरोप
नितेश राणे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 2:09 PM

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षाचे तिकीट विकतात हे 2005 मध्ये राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा एक महत्वाचं सत्य सांगितलं होत आजही तेच सुरु आहे. उबाठा मध्ये जी बंडखोरी सुरु आहे त्याच कारण हेच आहे जो मातोश्री कडे बॅगा पोचवेल त्याला तिकीट मिळते, असा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी सकाळी उठून बंडखोरी बाबत किती आव आणला तरी प्रामाणिक शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेच्या व्यापारमुळे अन्याय होत आहे, तिकिटाचं ऑक्शन आजही थांबलेलं नाही, असे ते म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी हिंदू धर्मासाठी सर्वांना अंगावर घेतले आहे हे त्यांना समजणार नाही. कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच काम फडणवीस यांनी केले आहे त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढविली आहे. तुझ्या मालकाला मच्छर पण मारायला येणार नाही त्यामुळे राज्य सरकारने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महायुतीचे सरकार येणार

हे सुद्धा वाचा

जिहादी हृदय सम्राट म्हणून उद्धव ठाकरे फिरत आहे, अशी टीका त्यांनी केली. आदित्य आणि तेजस ठाकरे यांना संजय राऊत यांच्या कडून धोका आहे. महाविकास आघाडीच्या तारखा आणि राऊत हा फार मोठा विनोद झालेला आहे, असे राणे म्हणाले. राऊत यांची 26 तारीखची सकाळ फडणवीस यांना बुके देताना फोटो काढण्यात जाईल, असा टोला त्यांनी हाणला. परत महायुतीचे सरकार निवडून द्यायचं जनतेने ठरवलेले आहे, असा दावा त्यांनी केला.

जरांगे यांच्यावर टीका

एकदा घोषणा होऊ दे. मग आधुनिक जिन्ना काय करतात ते समजेल, अशी टीका त्यांनी मनोज जरांगे यांच्या MMD पॅटर्नवर केली. मुळात निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवितात कि आरक्षणासाठी ते त्यांनी सांगावं. त्यांच्या बाजूला बसणारा हिंदूद्वेशी आहे. मोठा राक्षस कोण दाढीवाल्यांच्या हिशोबाने हिंदू समाज राक्षस आहे का? असा सवाल त्यांनी जरांगे पाटील यांना विचारला. तर जितेंद्र आव्हाड यांनी कितीही आरोप केले तरी ते मुस्लिम समाजाच्यासाठी काफीर आहे. हा जितूद्दीन निवडून येणार नाही म्हणून ते भाजपवर टीका करत असल्याचा आरोप राणे यांनी केला.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....