आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?, नितीन देशमुखांनी स्पष्टचं सांगितलं
निवडणुकीत आम्ही जिंकू किंवा पराभूत होऊ हा नंतरचा विषय आहे. मात्र भविष्यात या मतदारसंघाचा आमदारही नसलो तरी मतदारसंघात समाजकार्य काम याच्यापेक्षा दुप्पटीने दिसेल, असे देशमुख म्हणाले.
अकोला : आंबेडकर-उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असतील, तर आनंद आहे. असं मत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केलं. आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आज एक ओपन चॅलेंज दिलं. भर सभेत आमदार नितीन देशमुख बोलताना म्हणाले की, मतदार संघातील एकही व्यक्ती सांगत असेल की मतदार संघाचे विकास कामाचे काम आमदार यांच्याकडे नेले असतील. मतदारसंघातील कोणतेही बदली विषय नेला असेल. एखादा अंगणवाडी सेविकेचा विषय आमदाराजवळ नेला असेल. अन् कामासाठी ‘मी’ (नितीन देशमुख) ‘एक रुपया’ जरी मागितला असेल. तर सांगतोय राजकारणातून सन्यास घेईल.
आज भरसभेत बोलतो,असं ओपन चॅलेंज त्यांनी अकोला जिल्हातल्या वाडेगाव इथे आयोजित शिवसैनिकांचा मेळाव्यात केलं. दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत आणि जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधवसह नागरिक उपस्थित होते.
बाळासाहेब आणि उद्धव साहेबांचे यांची शिकवण आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. हे आमचं समाजकारण आहे. ‘जय-पराजय’ होत असतात. निवडणुकीत आम्ही जिंकू किंवा पराभूत होऊ हा नंतरचा विषय आहे. मात्र भविष्यात या मतदारसंघाचा आमदारही नसलो तरी मतदारसंघात समाजकार्य काम याच्यापेक्षा दुप्पटीने दिसेल, असे देशमुख म्हणाले.
आज जिल्ह्यातील वाडेगावमध्ये 1 हजार 100 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहेत.
खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या मोबाईलमध्ये आयोजित शिवसैनिकांचा मेळाव्यात चित्रीकरण करताना दिसून आले. कदाचित मेळाव्यामध्ये जमलेली गर्दी पाहून आजही लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असल्याचे त्यांना वाटले असणार. म्हणून जमलेल्या गर्दीचे आणि दिव्यांगांचे चित्रीकरण त्यांनी खुद्द आपल्या मोबाइलमध्ये केले आहे. स्वतः मंचावर उभे राहून सावंत यांनी जमलेली गर्दी मोबाईलमध्ये टिपली.