Akola News : अकोल्यात धक्कादायक घटना, तोल गेल्याने मोटारसायकलस्वार थेट उकळत्या तेलात पडला !

रस्त्यावरील अनधिकृत फूड स्टॉलधारकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या फूड स्टॉलमुळे धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Akola News : अकोल्यात धक्कादायक घटना, तोल गेल्याने मोटारसायकलस्वार थेट उकळत्या तेलात पडला !
बाईकचा तोल गेल्याने मोटारसायकलस्वार उकळत्या तेलात पडलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 2:02 PM

अकोला / 21 ऑगस्ट 2023 : अकोल्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रस्त्याने चाललेल्या एका मोटारसायकलचा तोल गेला आणि मोटारसायकलस्वार थेट उकळत्या तेलात पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. उकळत्या तेलात पडल्याने मोटारसायकलस्वार गंभीर भाजला आहे. यामुळे अनधिकृत स्टॉलचा प्रश्म पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या अनधिकृत स्टॉल धारकांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे व्हिडिओत?

अकोला शहरातील मंगरुळपीर रोडवरील सिंधी कॅम्पमधल्या पक्की खोली येथे अनिल कोल्डड्रिंक येथे शुक्रवार रात्री 9:15 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक मोटारसायकलस्वार बाईकवरुन घेऊन जाताना दिसत आहेय रस्त्याच्या कडेला एक फूड स्टॉल आहे. या फूड स्टॉलजवळ येताच मोटारसायकलस्वाराचा तोल गेला आणि तो फूड स्टॉलच्या दिशेने त्याची बाईक पलटली. यामुळे मोटारसायकलस्वार थेट उकळत्या तेलात पडला.

अनधिकृत फूड स्टॉलधारकांवर कारवाई होणार का?

यात मोटारसायकलस्वार गंभीर भाजला आहे. मात्र यानंतर तरुण कुठे गेला हे कळू शकले नाही. तसेच अद्याप पोलिसातही या घटनेची नोंद करण्यात आली नाही. या रोडवर नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या रोडवर अतिक्रमण असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. आतातरी मनपा आणि फूड एंड ड्रग्स विभाग लक्ष देईल का? हा प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.