Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते. हा वाद पुढे आणखी चिघळत चालला होता. याच वादाचे पर्यावसन पुढे हत्येमध्ये झाले.

Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:05 AM

पाथर्डी : विहिरीवरील वीज पंप सुरू करण्याच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील भागवत मारुती गर्जे (३८) याचा खून करण्यात आला. डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. मारेकरी युवक पसार झाला आहे. हत्या झालेल्या भागवत गर्जेला चार मुली, पत्नी व आई, वडील असा परिवार आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हत्याकांडाने पाथर्डी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

हत्येला कारणीभूत ठरलेला नेमका वाद काय?

वडगाव येथील रहिवासी बडे यांची जमीन भागवत गर्जे यांच्या वडिलांनी खरेदी केली होती. बडे यांचा पुतण्या व गर्जे यांच्यामध्ये जमिनीवरुन आणि विहिरीच्या पाण्यावरुन वाद होत होते. हा वाद पुढे आणखी चिघळत चालला होता. याच वादाचे पर्यावसन पुढे हत्येमध्ये झाले. हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी पंचांनी बसून प्रयत्न केले होते. त्यानंतरही बडे आणि गर्जे यांच्यात मतभेद सुरुच होते. 27 डिसेंबरला रात्री साडेबारा वाजता भागवत गर्जे हा शेताला पाणी देण्यासाठी गेला होता. वीज कनेक्शनचा फ्युज उडाल्यामुळे तो बसवून भागवत विहिरीवर आला होता.

याचदरम्यान तेथे दबा धरुन बसलेला आरोपी बडे याने भागवत गर्जे विहरीजवळ येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यात वार केला. हा वार डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने भागवत जमिनीवर कोसळला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही हत्या केल्यानंतर बडे याने भागवतला विहिरीत ढकलले. त्यानंतर बडेने अज्ञात व्यक्तीला फोन काॅल लावला आणि भागवत गर्जेचा काटा काढला, असे सांगितल्याचे उघडकीस आले आहे.

संशयित आरोपी फरार; पोलिसांकडून शोध जारी

या प्रकरणातील संशयित आरोपी बडे हा फरार झाला आहे. बडेचा आणि भागवत गर्जे याचा दिर्घ काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत. मृत भागवत गर्जेचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. भागवत गर्जेला चार लहान मुली आहेत त्यामुळे त्याच्या मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Youth killed in Ahmednagar over power pump dispute)

इतर बातम्या

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.