Gopichand Padalkar | ‘धनगरांचा सर्वात मोठा घात तिथेच झाला’, गोपीचंद पडळकर काय म्हणाले? VIDEO
Gopichand Padalkar | "तुम्ही STD च्या नादात किती दिवस गुरफटणार. STD म्हणजे साहेब, ताई आणि दादा. यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा" असं आमदार गोपीचंद पडळकर जाहीर सभेत म्हणाले.
बारामती : “तुमही का पेटून उठत नाही, तुम्हाला का राग येत नाही?. का तुमच्या तळपायाची आग मस्तकात जात नाही?. तुम्ही STD च्या नादात किती दिवस गुरफटणार. STD म्हणजे साहेब, ताई आणि दादा. यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडा’, एकदिवस तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई आणि दादा म्हणायच सोडून द्या. इंग्रजांच्या काळात गुलाम करण्यासाठी रचना केली होती, तशी या STD ची रचना आहे. आपला साहेब एकच डॉ. बाबासाहेब. बाबासाहेबांमुळे आपण आज माणसात आहोत. माझ्याघरात बाबासाहेबांचा फोटो आहे. रोज मी त्या फोटोच दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही” असं आमदार गोपीचंद पळकर म्हणाले. ते एका सभेमध्ये बोलत होते. “साहेब म्हणणं सोडून द्या, दबावात रहायच सोडून द्या. तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल, तर एकजूट, संघटित व्हा, त्यापलीकडे पर्याय नाही” असं पडळकर यांनी सांगितलं.
“80-90 च दशक होतं. डी. के.कोकरे नावाचा धनगर समाजातील एक मुलगा महाराष्ट्रातील वाड्या, वस्त्यांवर जाऊन मेंढपाळाना एकत्र करत होता. धनगरांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देत होता, ही गोष्ट पवारांच्या लक्षात आली. फोडाफोडीत माहीर असलेल्या पवारांनी आधी बाबासाहेबांचा रिपाई पक्ष फोडला. बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी फोडली, त्यांना धनगरांची चळवळ फोडायला जास्त वेळ लागला नाही” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ‘धनगरांचा सर्वात मोठा घात तिथेच झाला’
आमची मागणी ST ची होती. पण NT प्रवर्गात समावेश केला. धनगरांचा सर्वात मोठा घात तिथेच झाला. ST ची मागणी होती, NT दिलं. शरद पवारांनी तेव्हा ST म्हणून नोटिफाय केलं असतं, तर गोपीचंद पडळकरला धनगर जागर यात्रा काढण्याची वेळ आली नसती असं पडळकर म्हणाले.