VIDEO | देवेंद्र फडणवीस 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात; भाजप नेते पडळकरांची बोचरी टीका
भाजप नेते आणि आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीयत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात.
मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार (Sharad Pawar) हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीयत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात, अशी जोरदार टीका शुक्रवारी आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करून आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तो हल्ला सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. तिथे पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि भरधाव वेगाने डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पडळकर असे वाकयुद्धही रंगले होते.
काय म्हणाले पडळकर?
भाजप नेते आणि आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दहा-वीस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीयत. त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण, माननीय देवेंद्रजी असे दहा-वीस शरद पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा किती तरी प्रगल्भ नेतृत्व देवेंद्रजींचे आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका ही शरदचंद्र पवारांची आहे. तसले विषय सोडून त्यांच्या पुढचे नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्रजींच्या नेतृत्वात आहे, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या उत्तराची प्रतीक्षा
पडळकर यांनी यापूर्वी आपल्यावरील हल्ल्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप केला होता. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केले आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पवारविरोधातील राग आळवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना कोण उत्तर देणार, याची प्रतीक्षा आहे.
इतर बातम्याः
नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?
नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!