एसटी चालक-वाहकचा प्रामाणिकपणा, 60 हजार रुपयांनी भरलेली पर्स प्रवाशाला परत

पालघर स्वारगेट शिवशाही एसटी बसचे चालक बाबासाहेब शेख आणि वाहक तनवीर राजे यांनी प्रामाणिकता दाखवत प्रवाशाची पैशांनी भरलेली पर्स परत केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

एसटी चालक-वाहकचा प्रामाणिकपणा, 60 हजार रुपयांनी भरलेली पर्स प्रवाशाला परत
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 5:03 PM

पालघर : कोरोनाच्या अडचणीत उत्पन्नवाढीत पालघर एसटी विभाग राज्यात (Palghar ST Driver And Conductor Honesty) प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पालघर स्वारगेट शिवशाही एसटी बसचे चालक बाबासाहेब शेख आणि वाहक तनवीर राजे यांनी प्रामाणिकता दाखवत प्रवाशाची पैशांनी भरलेली पर्स परत केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे (Palghar ST Driver And Conductor Honesty).

पालघर एसटी डेपोमधून स्वारगेटला जाणारी शिवशाही एसटी बस हे दोघेही घेवून जात होते. बुधवारी ही बस पालघर डेपोहून 11 वाजता सुटली. त्यानंतर ठाणे येथून काही प्रवासी चढल्यानंतर बसने पुढील मार्गक्रमण केले.

यामध्ये एक तरुणी ठाण्यावरुन पिंपरी येथे जाण्यासाठी निघाली होती. तिची साठ हजार रुपये असलेली पर्स ती बसमध्येच विसरली. स्वतःच्या नादात ती पिंपरी येथे ही पर्स एसटी बस मध्येच विसरुन उतरली. एसटी बस स्वारगेट बस डेपोत पोहोचली.

पालघर डेपोची शिवशाही बस स्वारगेट डेपोत पोहोचल्यानंतर चालक शेख आणि वाहक राजे यांनी एसटीचा दरवाजा बंद करुन ते विश्रामगृहात विश्रामासाठी गेले. तेथे विश्राम करत असताना ही प्रवासी तरुणी त्यांच्याकडे रडत-रडत आली. त्यांनी तिची विचारपूस केल्यावर पैसे असलेली पर्स हरवली असल्याबाबत दोघांनाही सांगितले. त्यानंतर तिने बस तपासायला सांगितले. त्यानुसार, वाहक राजे यांनी चालक शिंदे यांना ही बाब सांगून बस तपासण्यासाठी पुढे पाठवले. चालक शेख यांनी ही एस टी उघडून एसटीमध्ये तपास केला असता तरुणी बसलेल्य आसनाखाली त्यांना ही पर्स सापडली. कर्तव्य दक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवत शेख यांनी ही पर्स आणली आणि त्या तरुणीकडे सुपूर्द केली.

पर्स बघताक्षणी गोंधळलेल्या तरुणीच्या जीवात जीव आला. पर्स हातात घेवून ती रडू लागली. तिने चालक शेख आणि वाहक राजे या दोघांचेही मनःपूर्वक आभार मानले.

या दोघांनी ही बाब पालघर डेपोला कळवली. पालघर डेपोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या दोघांचे अभिनंदन केले. कर्तव्य दक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवून प्रवाशाची पर्स परत केल्यामुळे पालघरचे एसटी विभागाचे व्यवस्थापकीय प्रमुख राजेंद्र जगताप यांनी दोघांचाही सत्कार केला. चालक वाहकाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Palghar ST Driver And Conductor Honesty

संबंधित बातम्या :

साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

एसटी कामगारांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांंचं उद्धव ठाकरेंना थेट पत्र

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.