मोठी बातमी | ‘पंढरपूरचं पांडुरंग मंदिर पूर्वीचं बौद्ध विहार, बौद्धांना हस्तांतरीत करा’ ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांची मागणी
पंढरपूर येथील मंदिराचा इतिहास, भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे.
पंढरपूर | उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीचा (Gyanvapi Asjid) मुद्दा कोर्टात सुरु असतानाच महाराष्ट्रातूनही मोठी बातमी आहे. समस्त वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Temple) हे पूर्वी बौद्ध धर्माचं विहार (Bauddh Vihar) होतं, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे. आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती… आमची विहारं पाडून मंदिरं आणि मशीदं बनवली, असा आरोप डॉ. आगलावे यांनी केला आहे. आगलावे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
डॉ. प्रदीप आगलावे यांचे दावे आणि मागण्या काय?
वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीच्या परिसरात हिंदु देवी देवतांच्या मूर्ता सापडल्याचा दावा केला जातोय. त्यासाठी सर्वेक्षणही केले जात आहे. याच धर्तीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावरही अभ्यास होण्याची गरज आहे. येथील मंदिराचा इतिहास, येथील भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे. त्यांचे दावे आणि मागणी पुढीलप्रमाणे-
- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते.
- आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत.
- यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती…
- आमची विहारं पाडून मंदिरं आणि मंस्जीद बनवली गेली….
- सध्या ज्ञानवापीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमचे विहारं परत द्या, अशी मागणी डॉ. आगलावे यांनी केली आहे.
- संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध झालेलं आहे.
- प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, “ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या” असा दावाही डॅा. आगलावे यांनी केलाय.