तोडपाणी करणारे धनंजय हे गोपीनाथ मुंडेंचे वारस कसे, पंकजांचा हल्ला
परभणी: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं.पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांविरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात, असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. त्या परभणीत बोलत होत्या. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात. तोडपाणी करणारे […]
परभणी: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं.पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांविरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात, असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. त्या परभणीत बोलत होत्या.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात. तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी जिंतूर येथील सभेत केला. युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं.
अनेक घरात भांडण लावण्याचं काम या राष्ट्रवादीने केले आहे. आमचं उदाहरण तर जगजाहीर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घराण्यात ते घराणेशाहीवर बोलतात, पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात, असा हल्लाबोल पंकजा मुंडेंनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव नुसतं वादी किंवा घरभेदी, घरफोडी पार्टी हवं होतं. प्रत्येक घरात त्यांनी भांडणं लावली, आग लावली. आमचं भांडण तर जगासमोर आहे. पण एक एक माणूस यांना सोडून चालला आहे, असा घणाघात पंकजा मुंडेंनी केला.