बीडचा बिहार झालाय हे आमदारांनी विधानसभेत सांगितलं, Pankaja Munde यांच्याकडून समाचार
इथं नवी जिल्हा परिषद व्हावी यासाठी ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी प्रयत्न केले, शिवाय माजी ग्रामविकास मंत्र्यांचेही मी आभार मानतो, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यानंतर मुंडे बंधू-भगिणींमधील वाद काहीसा क्षमणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात होता. मात्र काही तासातच पंकजा मुंडे यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला आहे.
औरंगाबाद : सकाळीच जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) एकत्र येण्याची साद घातली होती. आज या कार्यक्रमाला विनायक मेटे आले. असं व्यासपीठ बीडमध्ये पहावयास मिळत नाही. विकासाच्या कामांसाठी एकत्र येऊन एका व्यासपीठावर बसून विकासाची घडी बसविणे गरजेचे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. इथं नवी जिल्हा परिषद व्हावी यासाठी ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी प्रयत्न केले, शिवाय माजी ग्रामविकास मंत्र्यांचेही मी आभार मानतो, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यानंतर मुंडे बंधू-भगिणींमधील वाद काहीसा क्षमणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात होता. मात्र काही तासातच पंकजा मुंडे यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी बीडमधल्या गुन्हेगारीवरून (Beed Crime) धनंजय मुंडेंना पुन्हा टार्गेट केले आहे.
पालकमंत्र्यांवर ही वेळ येणं दुर्दैवी
बीडमधील गुन्हेगारीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमध्ये काय अवस्था झालीय हे मी सांगायची गरज नाही. बीडच्या आमदारांनी खुद्द लक्षवेधी मांडून सांगितलं बीडचा बिहार झाला आहे. पण हे मला आवडलं नाही. मी राष्ट्रीय लीडर आहे. बिहारला कमी माननं मला पटलं नाही. मी सुरूवातीपासून सांगत होते. बीडमध्ये माफीया आहे, वाळू तस्कर आहेत. प्रत्येक तक्रारीसाठी पोलीस राजकीय हस्तक्षेप घ्यायचे. आता बीडच्या एसपींना सुट्टीवर पाठवून नवीन एसपी द्यायचे ठरलं यातच सर्व आलंय. पण ही वेळ सत्ताधारी आमदारांवर आली हे दुर्दैव आहे, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंचा समाचार घेतला आहे. वाळूच्या चुकीच्या उत्खननामुळे चार मुलं मेली. त्यावरही आमदारांनी विनोदी स्टेटमेंट दिलं हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे आधीच्या अपयशाचे परिणाम आहेत. आमच्याकडे बोट दाखवू नका. असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडीलाही जोरदार टोला
MIM आणि महाविकास आघाडीच्या युतीच्या चर्चेबद्दल पंकजा मुंडेंना विचारले असता त्या म्हणाल्या, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आघाडीने कुणाला घ्यायचं हे त्यांनी ठरवावं. याबाबत मी काही बोलणार नाही. आम्ही लढणार आहोत. आम्ही भ्रष्टाचार हटवण्यासाठी लढणार आहे. महाविकास आघाडीने हे केलं नाही. तसेच आमचं नाणं खणखणीत आहे. हे तीन तिगाडा आणि कामबिघाडा आहे. आता त्यांना त्यांचं नाणं सिद्ध करण्याची गरज आहे. अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे.
नागपुरात किशोर कुमेरिया फुंकणार शिवसेनेत प्राण?, 25 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद!