AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, पंकजा मुंडे म्हणतात, सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे. (Pankaja Munde Letter to Rajesh Tope)

बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, पंकजा मुंडे म्हणतात, सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा
| Updated on: Apr 16, 2021 | 12:59 PM
Share

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. (Pankaja Munde Demand Remdesivir and corona vaccine to beed Letter to health minister rajesh tope)

REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले आहे. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

पंकजा मुडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र 

प्रति, आरोग्यमंत्री राजेश टोपे 

“बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 729 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 असली तरी त्यातील 30 हजार 478 रुग्ण बरे झाले आहेत.

एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

त्यामुळे आपणास विनंती आहे की, आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे Vaccine उपलब्ध करुन द्यावेत आणि तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे.”

(पंकजा गोपीनाथ मुंडे) 

(Pankaja Munde Demand Remdesivir and corona vaccine to beed Letter to health minister rajesh tope)

संबंधित बातम्या : 

अजित पवारांच्या सभेत स्टेजवर उपस्थिती, पंढरपुरातील नेत्याचं कोरोनामुळे निधन

VIDEO : पीपीई किट घालून खासदार प्रितम मुंडे थेट कोव्हिड वॉर्डात

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.