यंदाचा सावरगाव दसरा मेळावा ऑनलाईन, भगवान भक्तीगडावर येऊ नका,पंकजा मुंडेंचे आवाहन

भगवान भक्तीगड येथील दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असून भगवान बाबांच्या भक्तांनी सावरगावात येऊ नये, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. ( Pankaja Munde informs dasara melava of Savargaon will be organized online )

यंदाचा सावरगाव दसरा मेळावा ऑनलाईन, भगवान भक्तीगडावर येऊ नका,पंकजा मुंडेंचे आवाहन
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:44 AM

बीड: भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावेळीही दसरा भगवान भक्तीगडावर होईल मात्र तो ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावातील दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने भक्तांनी सावरगावत येऊ नये, अशी माहिती मुंडे यांनी दिली. ( Pankaja Munde informs dasara melava of Savargaon will be organized online )

दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होणार नाही. मात्र, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मेळावा ऑनलाईन होणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान भक्तीगडावर कोणीही गर्दी करु नये. घरातच राहून भगवान बाबांचे दर्शन घेण्याचे आवाहन मुंडेनी केली आहे.

दसऱ्याला भगवान भक्तीगडावर जाणार असून तिथे दर्शन घेतल्यानंतर समर्थकांना मार्गदर्शन करणार आहे. समर्थकांनी कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेऊन गावागावांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही पंकजा मुंडेंनी सांगतिले. भगवान भक्तीगडावर 2014 पासून पंकजा मुंडे यांच्या मार्फत दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झालाय.पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्यानं धक्का बसल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या:

Pankaja Munde | एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे : अर्जुन खोतकर

( Pankaja Munde informs dasara melava of Savargaon will be organized online )

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.