OBC आरक्षण: सरकारची आरक्षणाची मानसिकताच नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. (pankaja munde warn maha vikas aghadi over obc reservation)

OBC आरक्षण: सरकारची आरक्षणाची मानसिकताच नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
pankaja munde
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 6:42 PM

औरंगाबाद: ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची गरज नाही, इम्पिरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण मिळेल, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. (pankaja munde warn maha vikas aghadi over obc reservation)

पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील. आरक्षण नसेल तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाहीत. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसींची बाजू मांडायचीच नव्हती

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. या सरकारला ओबीसींची बाजू मांडायचीच नव्हती हा माझा दावा आहे. मागच्या सरकारमध्ये आम्ही अभ्यासगट स्थापन करून आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही अध्यादेश काढून कोर्टात सादर केला. हे सरकार आल्यानंतर 15 महिन्यात काही केलं नाही. अध्यादेशही लॅप्स झाला. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाल्याचं या सरकारने कोर्टात मान्य केलं. इथेच सर्व गमावलं, अशी टीका त्यांनी केली.

जनगणनेची गरज नाही

मराठा आरक्षण असो वा ओबीसी आरक्षण असो सरकार फेल ठरलं आहे. सरकार आणि कॅबिनेट शक्तीशाली असत. अजूनही ओबीसी आरक्षणाचा मार्ग काढू शकता. मागास आयोग नेमून ओबीसी आरक्षण अबाधित ठेवू शकता. कॅबिनेटमध्ये उपसमिती स्थापन करून हा निर्णय घेण्याची गरज आहे. ओबीसींची जनगणना हा मुद्दा वेगळा आहे. इथे इम्पेरिअल डाटा आवश्यक आहे. हा राज्याचा विषय असल्याने जनगणना न करता इम्पिरिकल डाटाच्या आधारे आरक्षण देता येऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही आवाज उठवू

जे वंचित, पीडित आहेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यांच्यासमोर आज प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. सरकारच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे, आता सरकार अपयशी ठरलं तर सरकारची इच्छा नाही हे स्पष्ट होईल. आम्ही स्वस्थ बसणार नाही, आवाज उठवू. तळागाळापर्यंत जाऊन आम्ही आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला. (pankaja munde warn maha vikas aghadi over obc reservation)

संबंधित बातम्या:

‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

Maharashtra News LIVE Update | मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नको : पंकजा मुंडे

मोठी बातमी ! 2018 दंगल प्रकरण, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना 6 महिन्यांची शिक्षा

(pankaja munde warn maha vikas aghadi over obc reservation)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.