कालपर्यंत फरार परमवीरसिंह 7 महिन्यांनी मुंबईत प्रकट, आज गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता!

मागील सात महिन्यांपासून गायब झालेल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना अखेर फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी त्यांनी चंदिगडमध्ये असल्याची माहिती माध्यमांना दिली. आज ते मुंबईत दाखल झाले. गायब होण्यापूर्वी त्यांच्याकडे गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा कार्यभार होता.

कालपर्यंत फरार परमवीरसिंह 7 महिन्यांनी मुंबईत प्रकट, आज गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता!
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 3:19 PM

मुंबईः  मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीरसिंह (Parambir singh) काल चंदिगडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. परमवीर सिंह आज सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने ते तत्काळ पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. परमवीर सिंह फरार होण्यापूर्वी ते राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदावर होते. मात्र त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर ते गायब झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरि संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. या पदावर अद्याप राज्य सरकारने कुणाचीही नियुक्ती केली नाही. त्यामुळे परमवीर सिंह यांचा पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा आहे. लवकरच ते आपल्या पदाची जबाबदारी स्वीकरण्याची शक्यता आहे.

सात महिन्यानंतर ‘रेंज’ मध्ये

मुंबईत आल्यानंतर तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार, अशी प्रतिक्रिया परमवीर सिंह यांनी काल दिली. आज ते मुंबईत दाखल झाले. परमवीर सिंह यांच्यावर सहा डिसेंबरपर्यंत अटकेची कारवाई करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशानंतर परमवीरसिंग बुधावरी सोशल मीडियावर प्रकटले. सात महिन्यांपासून बंद असलेला त्यांचा मोबाइल सुरु झाला. टेलिग्राम तसेच इतर सोशल मीडियावर ते ऑनलाइन दिसल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी मी चंदिगडमध्ये असून लवकरच तपास यंत्रणांपुढे हजर होईन, असे त्यांनी सांगितले.

विविध ठिकाणी खंडणीचे पाच गुन्हे!

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्याकांडानंतर परमीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमवीरसिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहात नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर काल बुधवारी तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आले.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पाहून कठोर निर्णय, परिवहन मंत्री परबांचा इशारा; तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन

फ्रेण्डशिप नाकारल्याचा राग, बारावीतल्या मुलाने कॉलेजमध्येच अल्पवयीन मुलीचा गळा चिरला

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.