नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पार्थ पवारांचे ‘सूचक’ ट्वीट
नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑ़डीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यात 11 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी ही घटना गंभीर असल्याचे सांगत, नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह जिल्ह्यातही होण्याची भीती त्यांनी वर्तवली. कारण तेथील अनेक रुग्णालयांचे फायर ऑ़डीटच झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील 110 रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. कोरोना रुग्णालयात देशात आग लागून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर ऑडीटच नाही, तर स्ट्रक्चरल ऑडीटही झाले असल्याची खात्री सबंधितांना करावी, असे सूचक ट्विट त्यांनी 3 तारखेला केले. त्यानंतर चार दिवसांतच नगर जिल्हा रुग्णालयात आग लागली. त्यावर या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ट्विट त्यांनी आज केले.
पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर असून, निष्पाप रुग्णांचा होरपळून बळी जाण्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका स्तरावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. @CollectorPune @PMCPune @pcmcindiagovin #pune #pcmc
— Parth Pawar (@parthajitpawar) November 9, 2021
शहरात अपूर्ण राहिलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना गैरसोईंना सामोरे जावे लागते आहे. सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित शहराचा कारभार बिघडवून सुरु केलेली कामे अपूर्ण ठेवली आहेत,असा हल्लाबोल करत त्यांनी, हीच का स्मार्टसिटी, अशी खोचक विचारणाही त्यांनी केली होती. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांविषयी ते सजग असल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी सत्ताधाऱ्यांचे लक्ष ते वरचेवर वेधीत आहेत. वेळप्रसंगी त्यांची खरडपट्टीही काढत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवर व पक्षाच्या चाललेल्या तयारी व हालचालीवरही त्यांचे लक्ष आहे. या तयारीसाठी शरद पवारानंतर अजित पवार शहरात येणार आहेत. त्यानंतर पार्थ येतील,असे राष्ट्रवादीतूनच सांगण्यात आले.
हे ही वाचा :
कथित वसुली प्रकरणात नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना 7 दिवसांची सीआयडी कोठडी