भविष्यातील इथेनॉलची गरज लक्षात घेता बांबू रिफायनरी सुरू करण्यात याव्यात, पाशा पटेल यांची मागणी
देशाचे इंधन आयातीवरील (Fuel imports) हजारो कोटी रुपये वाचवण्यासाठी 300 बांबू रिफायनरी (Bamboo refinery) सुरू कराव्यात अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे.
मुंबई : देशाचे इंधन आयातीवरील (Fuel imports) हजारो कोटी रुपये वाचवण्यासाठी 300 बांबू रिफायनरी (Bamboo refinery) सुरू कराव्यात अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पटेल यांनी म्हटले की, डिझेल, पेट्रोल आयातीवर देशाला 8 लाख 50 हजार कोटींहुन अधिक रक्कम खर्च करावी लागते. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरण्याचे प्रमाण वाढल्यास या खर्चात बचत होऊ शकते. आणखी काही वर्षांनंतर देशाला एक हजार कोटींहुन अधिक इथेनॉलची गरज लागणार आहे. बांबू हा इथेनॉलचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे सरकारने 300 बांबू रिफायनरी सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. इथेनॉलची गरज भागविण्यासाठी 17 लाख 60 हजार एकरवर बांबू लागवडची आवश्यकता असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
प्रदूषणाला आळा बसेल
पुढे बोलताना पाशा पटेल यांनी म्हटले आहे की, सध्या पेट्रोल डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषणात देखील मोठी वाढ झाली आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरल्यास प्रदूषण देखील कमी होऊ शकते. इथेनॉलची सध्याची गरज लक्षात घेता भविष्यात लाखो लिटर इथेनॉल लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजे आहे. त्यासाठी सरकारने बांबू रिफायनरी सुरू करण्यास प्रोहत्साहन द्यावे.
रोजगारात वाढ
बांबू हे एक असे पीक आहे जे कमी खर्चात येते. या पिकासाठी फार असा खर्च लागत नाही. बांबू रिफायनरी सुरू झाल्यास बांबू उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. शेतकरी बांबूच्या उत्पादनाकडे वळल्यास त्यांना पारपरिक पिकाच्या तुलनेत चांगला फायदा होऊ शकतो. तसेच बांबू रिफायनरी आणि बांबूपासून तयार होणाऱ्या इतर वस्तूंच्या निर्मितीतून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढू शकतो असे देखील पाशा पटेल यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Sugarcane Harvesting : गळीत हंगाम जोमात तरीही फडातला ऊस ‘कोमात’, तोडणी रखडल्याने काय होते नुकसान?
Rabi Season: उत्पादन घटूनही खर्चात वाढ, मुख्य पिकालाचे रोगाने घेरले