Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : राज्यातही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त; केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

Petrol Diesel Price : राज्यातही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त; केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचा मोठा निर्णय
आजचे पेट्रोल, डिझेल दर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 5:59 PM

मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने (Maharashtra Government) आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पंन कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. आता हे दर कमी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापासूनचे पेट्रोलचे नवे दर

मुंबई 109.45 पुणे 108.87 नाशिक 109.75 नागपूर 109.35 औरंगाबाद 110.95 परभणी 111.9 रत्नागिरी 110.77

डिझेलचे जुने दर

मुंबई 96.01 पुणे 94 नाशिक 94.85 नागपूर 94.48 औरंगाबाद 97.51 परभणी 96.91 रत्नागिरी 95.85

हे सुद्धा वाचा

पेट्रोलचे जुने दर

मुंबई 111.53 पुणे 110.95 नाशिक 111.83 नागपूर 111.43 औरंगाबाद 113.03 परभणी 113.98 रत्नागिरी 112.85

डिझेलचे जुने दर

मुंबई 97.45 पुणे 95.44 नाशिक 96.29 नागपूर 95.92 औरंगाबाद 98.95 परभणी 98.35 रत्नागिरी 97.29

केंद्राने किती दर कमी केले?

पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. अशी घोषणा कालच केंद्र सरकारने केली होती. तर राज्यानेही असाच निर्णय घ्यावा अशी मागणी सतत भाजप नेत्यांकडून करण्यात येत होती. त्यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत टिकेची झोड उडवली होती. मात्र आता राज्यानेही हा मोठा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिलाच आहे. त्याचबरोबर भाजपलाही प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता यावर भाजपकडूनही जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅस वापरकर्त्यांनाही दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाईवरून जनता तक्रारी करत आहे. तसेत विरोधकांकडूनही केंद्र सरकारवर जोरदार टीकाही होत आहे. महागाईविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या होत्या महिलांना घरगुती गॅस परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यावर चुली मांडून आंदोलनं केली. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून घरगुती गॅसवरही 200 रुपयांची सबसिडी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईचे चटके सोसणाऱ्या जनलेताल आता तुर्तास का होईना थोडासा दिलासा मिळाला आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.