कराडमध्ये विमानतळाचा विस्तार करण्याची योजना, नवीमुंबईचा एअरपोर्ट पुढच्या वर्षी सुरु होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कोल्हापूर परिसरात काही वर्षांपूर्वी पूर आला तेव्हा कोल्हापूर विमानतळ पाणी भरल्याने लोकांना लिफ्ट करण्यासाठी जवळपास विमानतळच नसल्याचे पुढे आले, त्यामुळे कराडमध्ये विमानतळ करण्याची योजना पुढे आली.

कराडमध्ये विमानतळाचा विस्तार करण्याची योजना, नवीमुंबईचा एअरपोर्ट पुढच्या वर्षी सुरु होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 2:31 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने  प्रक्रिया राबवि ण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे.  नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी यावेळी माहीती दिली.

मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल असे प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.

कराडला मोठा एअरपोर्ट का गरजेचा

काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या विमानतळाची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.

संभाजीनगरात मोठी विमाने उतरविता येणार 

मुंबई विमानतळाकडे दुपारचा टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याने रिजनल कनेक्टीविटी साठी अडचणी येत आहेत. तसेच संभाजीनगरातील विमानतळासाठी जमीन संपादनासाठी 800 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरात मोठी विमाने उतरविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला धावपट्टीसाठी लांबीसाठी जमिन मिळाली, परंतू रुंदीसाठी जमिन कमी पडली आहे. त्यामुळे आणखी जमिन संपादन करावे लागणार आहे.

एकाच नोडल एजन्सीसाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक 

नांदेड विमानतळासाठी सरकार पैसे  द्यायला तयार आहे. रिलायन्सकडून ते नंतर वसुल करण्यात येतील. परंतू नांदेडला नाईट लॅण्डींगची सुविधेसह काम व्हावे अशी योजना आहे. परंतू मुंबई विमानतळाकडे दिवसाचा स्लॉट नसल्याने अडचणी आहेत. एका नांदेडला नाईट लॅण्डींग सुविधा झाली की रिजनल कनेक्टीविटी होऊन विमानतळ फायद्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही विमानतळ एमआयडीसी तर काही अन्य एजन्सीकडे असल्याने सर्वांसाठी एकच नोडल एजन्सी तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बैठक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द.
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.