Palkhi Marg | तब्बल 11 हजार कोटींचा खर्च, पूर्ण रस्त्यावर पदपथ, पालखी मार्ग आहे तरी कसा, काय फायदे होणार ?

भूमिपूजनाच्या सोहळ्यात तब्बल 12,294 कोटी रुपयांचे 574 किलोमीटर लांबीच्या तेरा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आणि लोकार्पण करण्यात आले. या भूमीपूजन सोहळ्याची आज (8 नोव्हेंबर) चांगलीच चर्चा झाली असून तो नेमका कसा आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे.

Palkhi Marg | तब्बल 11 हजार कोटींचा खर्च, पूर्ण रस्त्यावर पदपथ, पालखी मार्ग आहे तरी कसा, काय फायदे होणार ?
PALKHI MARH
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 6:36 PM

मुंबई : वारकरी संप्रदायासाठी तसेच दळणवळण सोपे होण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य मंत्र्यांची उपस्थिती होती. भूमिपूजनाच्या सोहळ्यात तब्बल 12,294 कोटी रुपयांचे 574 किलोमीटर लांबीच्या तेरा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आणि लोकार्पण करण्यात आले. या भूमीपूजन सोहळ्याची आज (8 नोव्हेंबर) चांगलीच चर्चा झाली असून तो नेमका कसा आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे.

कोणत्या मार्गाचे झाले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन ?

♦ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (NH-985)

 मोहोळ ते वाखरी रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज एक)- रस्त्याची लांबी : 44.70 किमी तर किंमत 1438 कोटी रुपये

 वाखरी ते खुडूस रस्त्याचे चौपदरीकरण ((पॅकेज दोन) – रस्त्याची लांबी:33.10 किमी तर किंमत 979 कोटी रुपये

 खुडूस ते धर्मपुरी रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज तीन) – रस्त्याची लांबी: 39.20किमी तर किंमत: 1154 कोटी रुपये

 धर्मपुरी ते लोणंद रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज चार) – रस्त्याची लांबी 49.40 किमी. तर किंमत 1412 कोटी रुपये

 लोणंद ते दिवेघाट रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज पाच) -रस्त्याची लांबी 54.50 किमी तर किंमत 1710 कोटी रुपये

♦ संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-985G) 

 पाटस ते बारामती रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज 1)- रस्त्याची लांबी : 41.36 किमी तर किंमत 1343 कोटी रुपये

 बारामती ते इंदापूर रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज दोन) रस्त्याची लांबी 42.13 किमी तर किंमत 1471 कोटी रुपये

इंदापूर ते तोंडसे रस्त्याचे चौपदरीकरण (पॅकेज तीन)- रस्त्याची लांबी: 46.70 किमी तर किंमत 1601 कोटी रुपये

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण झालेल्या काही रस्त्यांचे लोकार्पण केले. त्याची माहिती खालीलप्रमाणे

म्हसवड-पिलीव पंढरपूर रत्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 53.08 किमी तर किंमत : 263 कोटी रुपये

कुर्डुवाडी ते पंढरपूर रस्त्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी: 48.37 किमी तर किंमत: 212 कोटी रुपये

पंढरपूर ते सांगोला रस्त्याचे पुनर्विकास व उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 31.15 किमी तर किंमत: 177 कोटी रुपये

टेंभूर्णी ते पंढरपूर रस्त्याचे उन्नतीकरण- रस्त्याची लांबी : 36.19 किमी तर किंमत: 112 कोटी रुपये

पंढरपूर-मंगळवेढा-उमदी रस्त्याचे उन्नतीकरण- रस्त्याची लांबी 54.33 किमी तर किंमत 422 कोटी रुपये

 प्रकल्पाचे फायदे

 विठ्ठल भक्तांसाठी दोन्ही बाजूंनी सुरक्षित आणि सुलभ पदपथ तयार करण्यात येणा आहे. (पालखी मार्ग)

पंढरपूर आणि पुणे यांची आधुनिक चौपदरी राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडणी केली जाणार

सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशीरस, पंढरपूर, बारामती, बावडा, अकलुज आणि श्रीपूर-बोरगाव येथे दाट लोकवस्तीला बाह्यवळण.

पुणे ते पंढरपूर प्रवासाच्या वेळेत 2 तासांची बचत, प्रदुषणात घट

 कृषीमाल आणि स्थानिक उत्पादनाकरीता मोठ्या बाजारपेठेत जाण्यासाठी सुलभ मार्गाची उपलब्धी

पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना

इतर बातम्या :

VIDEO: पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नका, नंदुरबारच्या पालकमंत्र्यांचे विद्युत कंपन्यांना आदेश

(pm modi addressing lay foundation stone of palkhi marg know all about palakhi road its budget usefulness)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.