Police Recruitment : उठा तयारीला लागा! राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती, कसा करायचा अर्ज?

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे.

Police Recruitment : उठा तयारीला लागा! राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती, कसा करायचा अर्ज?
राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:46 AM

मुंबई : राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. कारण राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती (Police Recruitment) निघणार आहे. त्यासाठीच्या हलचाली गृह विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा (Police Bharti 2022) मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी (Job) देणारी ही भरती असणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठीच भरती

ही भरती प्रक्रिया ही केवळ पोलीस कॉन्टेबल या पदासाठी पार पडणार आहे. एक ते दीड महिन्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकार आणखी एका मोठ्या भरतीच्या तयारीत असल्याची माहितीही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच पाच हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता हा दुसरा टप्पा हा सात हजारांचा असणार आहे. तर तिसरा टप्पा हा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पुढील काही दिवस हे चांगले असणार आहेत. त्यांना भरतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा

गेल्या दोन वर्षा कोरोनामुळे भरती प्रक्रिया ही मंदावली होती. कोरोनाचा कहर वाढल्याने अनेकदा पोलीस भरतीच्या तारखा पुढेही ढकलण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनात अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेक उद्योगधंदे देशोधडीला लागल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आलीय. हाताला काम नसणाऱ्या तरुणांची सख्या राज्यात सध्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. त्या तरुणांना आता ही आनंदवार्त सुखावणारी आहे. त्यांचे भरती होण्याच स्वप्न सत्यात उतरण्यास या भरतीने मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता तरुणांकडून तयारी आणखी जोमाने करण्यात येत आहे. या भरतीसाठी हजारो तरुण अर्ज करण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.