अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या 16 आमदारांची आमदारकीची कारकीर्द नेमकी किती?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल उद्या सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास सर्वच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या 16 आमदारांची आमदारकीची कारकीर्द नेमकी किती?
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 6:43 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील हा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा उद्या सकाळी 11 वाजता लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे गट नेमकं कोणाच्या बाजूने लागणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. महिन्याभरापूर्वी दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाला. आता येत्या 11 मे म्हणजेच उद्या निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित निकाल हा शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लागला तर शिंदे गटाचे तब्बल 16 आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. या 16 आमदारांविषयी आम्ही सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.

‘या’ 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

1) एकनाथ शिंदे

या सत्तानाट्याचे उद्गाते आणि प्रमुख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकनाथ शिंदे हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही पंचवार्षिक निवडणुकांध्ये ते निवडून आले आहेत. गेल्या 2019च्या निवडणुकीत शिंदे तब्बल 89,300 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा पराभव केला होता.

2) अब्दुल सत्तार

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभेच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमधून तीनवेळा निवडून आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांचा 24,381 मतांनी पराभव केला होता.

हे सुद्धा वाचा

3) संदीपान भुमरे

शिवसेनेचे संदीपान भुमरे यांचा देखील यामध्ये समावेश आहे. संदीपान भुमरे हे तब्बल पाच वेळा पैठण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 1994, 1999, 2004, 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये निववडून आले होते. त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा 14,139 मतांनी पराभव केला होता.

आणखी ‘या’ आमदारांचा समावेश

4) संजय शिरसाठ

मतदारसंघ – छत्रपती संभाजीनगर आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राजू शिंदे (अपक्ष) किती मतांनी विजयी – 40,445 मतं

5) तानाजी सावंत

मतदारसंघ – भूम, परंडा (धाराशीव) आमदारकी – २०१९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्याआधी 3 वर्षे विधान परिषदेचे आमदार 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांना पराभूत केलं किती मतांनी विजयी – 32,902 मतांनी विजयी राजकीय प्रवास – तानाजी सावंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत.

6) यामिनी जाधव

मतदारसंघ – भायखळा, मुंबई आमदारकी – पहिली टर्म 2019ला कुणाला पराभूत केलं ? – एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण किती मतांनी विजयी – 20,023 मतं

7) चिमणराव पाटील

मतदारसंघ – पारोळा, एरंडोल (जळगाव) आमदारकी – दोन वेळा (2009,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे सतीश पाटील किती मतांनी विजयी – 18,002 मतं

8) भरत गोगावले

मतदारसंघ – महाड आमदारकी – 3 वेळा आमदार (2009, 2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेस उमेदवार माणिकराव जगताप किती मतांनी विजयी – 21,575 मतं

9) लता सोनावणे

मतदारसंघ – चोपडा (जळगाव) आमदारकी – पहिली टर्म (2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे जगदीश वळवी किती मतांनी विजयी – 20,529

10) प्रकाश सुर्वे

मतदारसंघ – मागाठाणे, मुंबई आमदारकी – 2 वेळा (2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – मनसेचे नयन कदम किती मतांनी विजयी – 46,547 मतं राजकीय प्रवास – राष्ट्रवादीतून शिवसेना

11) बालाजी किणीकर

मतदारसंघ – अंबरनाथ, ठाणे आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे रोहित साळवे किती मतांनी विजयी – 29,294 मतं

12) अनिल बाबर

मतदारसंघ – खानापूर (सांगली) आमदारकी – 4 वेळा (1990,1999,2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशीव पाटील किती मतांनी विजयी – 26,921 मतं राजकीय प्रवास – काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना

13) महेश शिंदे

मतदारसंघ – कोरेगाव (सातारा) आमदारकी – पहिली टर्म (2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे किती मतांनी विजयी – 6,232 मतं राजकीय प्रवास – भाजप ते शिवसेना

14) संजय रायमुलकर

मतदारसंघ – बुलढाणा आमदारकी – 3 वेळा (2009,2014,2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे अनंत वानखेडे किती मतांनी विजयी – 62,202

15) रमेश बोरणारे

मतदारसंघ – वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) आमदारकी – पहिली टर्म (2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर किती मतांनी विजयी – 59,163

16) बालाजी कल्याणकर

मतदारसंघ – नांदेड उत्तर आमदारकी – पहिली टर्म (2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – काँग्रेसचे डी.पी.सावंत किती मतांनी विजयी – 12,353

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.