Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड या तरुणाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. (pooja chavan suicide case: who is arun rathod?)

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 11:14 AM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड याला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान कमालीची गुप्तता पाळली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. अरुण राठोडला ताब्यात घेतल्यानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची शक्यता आहे. पूजा आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात वन मंत्री संजय राठोड आणि अरुण राठोड यांचं संभाषण होतं. त्यावरून या दोघांनाही पूजा आत्महत्या करणार असल्याचं माहीत असल्याचं दिसून येत आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असल्याचे मानलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील अरुण राठोड कोण आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून त्याविषयीचा घेतलेला हा आढावा. (pooja chavan suicide case: who is arun rathod?)

अरुण राठोड वनमंत्र्यांचा कार्यकर्ता

अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे

परळीचा रहिवासी

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडे होतं असं सूत्रांनी सांगितलं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे.

म्हणून पूजा अरुणच्या संपर्कात

परळीत राहून भाजपमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली. राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडे सोपवली होती. पूजाला मॉडेलिंग करायची होती. त्यात अरुण तिला मदत करत होता. त्यामुळे हे दोघेही पुण्यात एकत्र राहू लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती

अरुण आणि मंत्र्याच्या संभाषणातून अरुणला पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती असल्याचं दिसून येतं. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.

पूजाचा भाऊ असल्याचा बनाव

अरुण राठोड याचा पूजाशी काहीही संबंध नव्हता. तो पूजाचा नातेवाईक नव्हता. पण बाहेर वावरताना पूजाचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगायचा. पूजाला एकूण सहा बहिणी आहेत. पूजा ही पाचवी आहे. तिच्या चारही बहिणींचं लग्न झालेलं आहे. तिला भाऊ नाही. मात्र, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण हा पोलिसांना तो पूजाचा चुलत भाऊ असल्याचं सांगत असल्याचं ऐकायला मिळतं.

अरुण रुग्णालयात होता

अरुण आणि संजय राठोड यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात पूजाने आत्महत्या केली. त्या दिवशी अरुण रुग्णालयातच असल्याचं दिसून येतं. पोलिसांनीही अरुणची जबानी घेतल्याचं दिसून येतं. पोलिसांना त्याने त्याचं वय 24 असल्याचं सांगितल्याचंही या क्लिपमधून कळतं. मुलगी कशी पडली? असं त्याला विचारलं जातं. तेव्हा ती पडली तेव्हा बघितल्याचं सांगतो. ती कशी पडली हे कळलं नसल्याचं तो सांगतो. त्यावर ती पडली की तिने उडी मारली? असा सवाल पोलीस करतात. त्यानंतरचं क्लिपमधील संभाषण तुटल्याने त्याने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कळत नाही.

आत्महत्येची माहिती होती?

अरुणला पूजाच्या आत्महत्येची संपूर्ण माहिती होती हे या क्लिपमधून स्पष्ट कळतं. पूजा आत्महत्या करणार असल्याचं तोच मंत्र्याला सांगतो आणि पूजाला वाचवण्याची विनवणीही करत असल्याचं या क्लिपमधून जाणवतं.

पूजाच्या आत्महत्येच्या निर्णयाने अरुण घाबरला

पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने तो घाबरला होता होता. त्यामुळेच तो आत्महत्या काही पर्याय नाही, तुम्ही तिला समजवा. तिला वाचवा. तिला कन्व्हिन्स करा, असं वारंवार राठोडांना सांगत असल्याचं या क्लिपमधून जाणवतं. पूजाने आत्महत्या करू नये म्हणून त्याने बराच आटापिटा केल्याचंही जाणवतं. पूजाने आणलेली किट पॉझिटिव्ह निघाली तेव्हाही तो घाबरल्याचं या क्लिपमधून स्पष्ट होतं.

मोबाईल अरुणकडे?

या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे पूजाचा मोबाईल आहे. हा मोबाईल लंपास करण्यासाठी राठोड यांनी अरुणवर वारंवार दबाव आणल्याचं क्लिपमधून स्पष्ट होतं. त्यामुळे अरुणने पूजाचा मोबाईल लंपास केल्याचंही कळतं. या मोबाईलमध्ये असंख्य पुरावे असावेत म्हणूनच हा मोबाईल लंपास केला असावा. हा मोबाईल सापडल्यास अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे पोलिसांनी हा मोबाईल हस्तगत करावा, अशी मागणी होत आहे.

आधी अरुणला अटक करा

अरुण राठोडला सर्वात आधी अटक करावी, अशी मागणी पूजा चव्हाण यांच्या परळीतील नातेवाईकांनी केली आहे. अरुण राठोडला अटक झाल्यानंतर पूजाने नेमकं आत्महत्या का केली? हे प्रकरणं काय आहे? याला संजय राठोड जबाबदार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोर येणार आहेत. (pooja chavan suicide case: who is arun rathod?)

पोलिसांचं पथक परळीत नाहीच

या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहे. पूजाने रविवारी आत्महत्या केली. या घटनेला सहा दिवस उलटून गेले आहेत. तरीही परळीत अद्याप एकाही पोलिसाचं पथक आलेले नाही. मात्र पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली, तर कदाचित अरुण राठोडचा तपास लवकर लागेल, असे बोललं जात आहे. पोलिसांनी यावेळी बीडकडे जर लक्ष दिलं तर अरुण राठोडला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे बोलले जात आहे. (pooja chavan suicide case: who is arun rathod?)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(pooja chavan suicide case: who is arun rathod?)

त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.