AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Khedkar : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावणीवेळी काय काय घडलं?

पूजा खेडकर प्रकरणात 15 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती, मात्र पूजाला अटक करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने पूजा खेडकर प्रकरणात आज म्हणजे 21 एप्रिलची सुनावणीची तारीख दिली होती. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात बरेच युक्तिवाद झाले.

Pooja Khedkar : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सुनावणीवेळी काय काय घडलं?
पूजा खेडकर
| Updated on: Apr 21, 2025 | 12:14 PM
Share

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2022मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपात पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या लुनावणीदरम्यान पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. जोपर्यंत पूजा खेडकर ही याप्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम असेल. आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. पूजा खेडकर हजर राहील, चौकशीत सहकार्य करेल, असे खेडकरांच्या वकिलांतर्फे सांगण्यात आलं.

पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दिल्ली पोलिसांकडून पूजाच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तुम्ही तिला चौकशीसाठी का बोलावलं नाही असा सवाल न्यायालयाने विचारला असा आम्हाला तिची कोठडीत चौकशी करायची आहे. सर्वसाधारण चौकशीसाठी बोलवायचं नाहीये, असे दिल्ली पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण असल्याचंही दिल्ली पोलिसांनी नमूद केलं.

कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, वकिलांचा युक्तिवाद

पूजा खेडकर प्रकरणात 15 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती, मात्र पूजाला अटक करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने पूजा खेडकर प्रकरणात आज म्हणजे 21 एप्रिलची सुनावणीची तारीख दिली होती. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात बरेच युक्तिवाद झाले. पूजा खेडकर यांच्या बाजूने माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांचे चिरंजीव श्रेयस लळीत बाजू मांडण्यासाठी उभे राहिले. पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती, मात्र तिची कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी केला.

यूपीएससीचा जामीनाला विरोध

पूजा खेडकर हिने मोठी फसवणूक केली असून तिच्या कस्टोडियल तपासाची गरज असल्याचा युक्तिवाद युपीएससीच्या वकिलांनी गेल्या सुनावणीत केला होता. मात्र, आम्ही तपासात सहकार्य करायला तयार असल्याचं सांगत पूजा खेडकर यांच्या वकिलाने कस्टोडियलला विरोध केला.

आत्तापर्यंत काय घडलं ?

* 15 जानेवारी 2025: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या बेंच ने पूजा खेडकर यांना 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं.

दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस जारी करून खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उत्तर मागितलं होतं.

* 14 फेब्रुवारी 2025 : सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पूजा खेडकर हिला अटकेपासून संरक्षण दिलं. तसंच पूजा खेडकर हिला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.

काय आहे प्रकरण ?

* पूजा खेडकर वर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेंम्पट मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.

* दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर प्रकरणात प्रथमदर्शी “मोठा कट” असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं.

* यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली आहे

* मात्र पूजा खेडकर हिने सर्व आरोप फेटाळले आहे.

पुढील सुनावणी कधी ?

दरम्यान 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.  जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील, असे न्यायालयाने नमूद केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.