Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत वेगाने सुधार, हलका, मऊ आहार देण्याचा डॉक्टरांचा सल्ला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंतेचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी बायपास सर्जरी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची प्रकृती वेगाने सुधारत असून चिंतेचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांना हलका आणि मऊ आहार देण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (Prakash Ambedkar undergone bypass surgery his condition is improving rapidly)
सध्या चिंतेचे कारण नाही, कुटुंबीयांना भेटण्याची मुभा
प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयावरील बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्यांना सध्या हलका आणि मऊ आहार देण्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या प्रकृती स्थिर असल्यामुळे आंबेडकर यांच्या कुटुंबीयांना त्यांची थोड्या वेळेसाठी भेट घेता येणार आहे.
याआधी प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांची सुट्टी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
मेडिकल बुलेटिन – 11 जुलै
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती वेगाने सुधारत असून त्यांना हलका मऊ आहार द्यायला सुरुवात झाली आहे. केवळ कुटुंबातील सदस्यांनाच थोडा वेळ भेटीची परवानगी देण्यात आली आहे. pic.twitter.com/OcbqPchXLB
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 11, 2021
आंबेडकर काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं होतं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय कयास वर्तवले जात होते.
इतर बातम्या :
मोठी बातमी! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
(Prakash Ambedkar undergone bypass surgery his condition is improving rapidly)