गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच, शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालंय.
अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख (Brother of Shankarrao Gadakh) यांच्या पत्नी गौरी गडाख शनिवारी रात्री अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. झाल्याप्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज (रविवार) गौरी यांचा शवविच्छेदन अहवाल प्रात झाला असून त्यांनी गळफास घेतल्याचं शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं आहे. (Prashant Gadakh Wife Gauri Gadakh Death Due to hanging)
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झालंय. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे मात्र पोलीस तपास सुरु असून जे काही समोर येईल त्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. त्यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान थोड्याच वेळात गौरी यांच्या मृतदेहावर त्यांच्या मूळगावी म्हणजे सोनई येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला आहे.
गौरी गडाख यांचा शनिवारी दुपारीच मृत्यू झाला होता, मात्र सायंकाळी उशिरा ही माहिती सार्वजनिक झाली. गौरी गडाख यांना सायंकाळच्यावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.
दरम्यान, या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
कोण आहेत गौरी गडाख
-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सूनबाई.
-समाजकारणात गौरी गडाख सक्रिय होत्या.
-अनेक समाजोपयोगी उपक्रम गौरी यांनी राबवले होते.
(Prashant Gadakh Wife Gauri gadakh Death Due to hanging)
संबंधित बातम्या