Pravin Darekar : कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ, प्रवीण दरेकर भडकले
आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबै बँक प्रकरणी मनिषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मनिषा कायंदे यांच्या या मागणीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकले.
मुंबई : आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे (manisha kayande)यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. मुंबै बँक प्रकरणी मनिषा कायंदे यांनी संचालक मंडळ बरखास्त करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मनिषा कायंदे यांच्या या मागणीवर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी विधान परिषदेत प्रत्युत्तर देताना, ‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ, असं म्हणत मनिषा कायंदे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. पुढे बोलताना दरेकर म्हणाले, ‘विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे.’ दरम्यान, यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकल्याचे दिसून आले.
कायंदेंची मागणी काय?
शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत आज मुंबै बँकेच्या कथिक घोटाळ्याचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सभागृहात बोलताना भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली. आमदार मनिषा कायंदे म्हणाल्या की, ‘मुंबै बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं अहवाल दिला आहे. या अहवालात म्हटलंय की, मुंबै बँकेला बरखास्त करा आणि प्रशासक नेमा. यावरुन मुंबै बँकेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा.’ अशी मागणी शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी सभागृहात केली.
‘आम्ही तुरुंगात जाऊ’
आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबै बँकेच्या कथिक घोटाळ्याचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर जोरदार दिलं. यावेळ दरेकर म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे. कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ. आमच्यासोबत महाराष्ट्रातील लोक तुरुंगात जातील. पण, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर बोलणं उचित नाही, असंही दरेकर यावेळी म्हणाले.
प्रवीण दरेकर भडकले
आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबै बँकेचा मुद्दा काढताच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भडकल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी मनिषा कायंदे यांना उत्तर देताना म्हटलंय की, ‘कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ. विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे.’ मनिषा कायंदे यांनी, ‘विधान परिषदेत मुंबै बँक प्रकरणी भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, या केलेल्या मागणीमुळे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चांगलेच भडकल्याचं दिसून आलं.
इतर बातम्या