धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, मामीनेच केले गंभीर आरोप, घरातूनच राजीनाम्याची मागणी

धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी त्यांच्यावर जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नोकराद्वारे दहशतीखाली जमीन हडप केली. सारंगी महाजन यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे आणि या प्रकरणी न्यायालयीन कारवाई सुरू केली आहे.

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत, मामीनेच केले गंभीर आरोप, घरातूनच राजीनाम्याची मागणी
मंत्री धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 7:34 PM

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या घरातील व्यक्तीनेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन (प्रवीण महाजन यांच्या पत्नी) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आपली जमीन हडप केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी सारंगी महाजन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“मुख्यमंत्र्यांनी मला खात्री दिली आहे. मी तुम्हाला न्याय देईन म्हणून. माझ्या भाच्याने धनंजय मुंडे यांच्या नोकराने जागा हडप केली आहे. खरंतर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती. समोर येऊन मला बोलला असता की, मामी तुझी जागा आहे. आम्हाला हवी आहे तर आपण कमी-जास्त व्यवहार करुन ती जमीन देऊ शकलो असतो. पण त्यांनी माझी फसवणूक केली. त्याने मला तिथे परळीला बोलावलं. त्याच्या नोकराला व्यवहारात मध्ये ठेवलं. गोविंद बालाची मुंडे हा त्याचा नोकर होता. त्याला मध्ये ठेवलं. त्या नोकराच्या माध्यमातून दीड एकर पेक्षा जास्त जमीन हडप केलेली आहे. त्यातील 27 गुंठे जमीन शासनात गेली आहे”, असा दावा सारंगी महाजन यांनी केला.

‘फक्त गोड बोलून मला परळीत बोलावलं…’

“शासनाचा रेडी रेकनर रेट कमी दाखवून मला कमी पैसे मला मिळवून दिले आहेत. मला माझी जागाही माहिती नव्हती की, कुठे आहे, तसेच ही जागा कुणाला विकत आहोत हेही माहिती नव्हतं. फक्त गोड बोलून मला परळीत बोलावलं. परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं. परळीत अनुसया हॉटेलमध्ये ठेवलं. तिथे त्यांचे चार-पाच लोकं होते, त्यांनी तिथून मला रजिस्टर ऑफिसमध्ये नेलं. तिथे रजिस्टारने आम्हाला काहीही विचारलं नाही. तिथे थेट आमची स्वाक्षरी घेतली, फोटो काढला आणि आम्हाला बाहेर काढलं”, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘आम्ही प्रचंड दहशतीखाली सह्या केल्या’

“तिथे रजिस्टर कार्यालात 50 माणसं असतील, त्यापैकी कोण माझी जागा घेत आहे ते सुद्धा मला कळलं नाही. आम्ही प्रचंड दहशतीखाली सह्या केलेल्या आहेत. एवढी दहशत तिथे असेल किंवा त्यांनी जी दहशत दाखवली ती खरी आहे हे आम्हाला आज जे प्रकरण उघडकीस येत आहेत तेव्हा जाणवत आहे. विशेष म्हणजे असं काही समोर येत नाही तोपर्यंत आपल्या घरातील नातेवाईक असे नाहीत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मला या जागेप्रकरणी न्याय पाहिजे आहे. मी 18 ऑक्टोर 2024 ला अंबाजोगाई जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे”, असं सारंगी महाजन यांनी सांगितलं.

‘अजित पवार यांनी देखील खात्री दिली…’

“बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, ताशेरे ओढले तेव्हा मला कागदपत्र पोलिसांनी दिले. रिसिव्ह कॉपी ठाण्याच्या घरी मिळाली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की न्याय मिळवून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खात्री दिली आहे, धनंजयला समोर आणत न्याय मिळून देतो असं सांगितलं आहे”, अशी माहिती सारंगी महाजन यांनी दिली.

‘धनंजय मुंडेंची आमदारकीदेखील रद्द करावी’

“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे मी समर्थन करेन. दीड वर्ष मला प्रचंड त्रास दिला आहे. स्वत: भेटायचा नाही, स्वत:चीच जागा होती असं दाखवत होता. चोराकडेच न्याय मागत आहे असं वाटायला लागलं. आमदारकी देखील रद्द करावी. जनतेत त्याने राहून काम करावं. माज कमी करावा”, अशी टीका सारंगी महाजन यांनी केली.

‘पंकजाही धुतल्या तांदळाची नाही’

“दुसऱ्या भागातील अधिकारी सरकारने ठेवावे. जेणेकरुन त्याचं अधिकारी ऐकणार नाहीत. धनंजय मुंडे यांच्या घरी जिल्हाधिकारी जातो. रजिस्टार, एसपी येतात असं मला त्यांचेच लोकं सांगतात. जमीन त्यांच्या शिवाय विकल्या जात नाहीत. तसेच पंकजाही धुतल्या तांदळाची नाही, तिची देखील मुकसंमंती होती. माझ्याकडे मुंडे यांचे नातेवाईक म्हणून न पाहाता सर्वसामान्य नागरिक म्हणून पाहावं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील यांच्याविरोधात लढायला बळ मिळेल”, असंदेखील सारंगी महाजन म्हणाल्या.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.