महागाई, बेरोजगारी ते लाडकी बहीण, प्रियंका गांधींनी गडचिरोलीच्या सभेत सर्वच काढलं, भाजपावर जोरदार हल्लाबोल

गडचिरोलीमध्ये बोलताना प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महागाई, बेरोजगारी ते लाडकी बहीण, प्रियंका गांधींनी गडचिरोलीच्या सभेत सर्वच काढलं, भाजपावर जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 3:36 PM

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबरला शनिवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज गडचिरोलीच्या वडसा येथे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रचार सभा झाली, या प्रचारसभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांधी? 

आमची घटना मजबूत, महाराष्ट्र ही मार्गदर्शक भूमी आहे. ही संघर्षाची भूमी आहे.  संतांनी एकजुटतेचा संदेश दिला. घटना सांगते, सर्वांचे प्रतिनिधित्व हवे. काँग्रेसनं मोठ्या संस्था उभारल्या, पण आज महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. 10 लाख कोटींची गुंतवणूक बाहेर गेली. मोदींच्या राज्यात कुणीही सुरक्षित नाही, जिथे आम्ही सरकार बनविले, गॅरंटी दिली, लगेच पूर्ण केली. छत्तीसगडमध्ये आणि अन्य राज्यात हेच झाले. भाजपाचं या उलट आहे, यांच्याकडे उत्तर नाही. हे भावना भडकावून निवडणूक जिंकतात. यांनी उत्तरदायित्वाची परंपरा संपविली. काहीही बोलायचे आणि जिंकायचे असे चालणार नाही, असा घणाघात यावेळी प्रियकां गांधी यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महिला अधिक श्रम करतात. महागाई वाढली प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे. शिक्षण घेणाऱ्याचे भविष्य नाही.  रोजगार नाही सरकार श्रमाचे समर्थन करत नाही. विमानतळ, पोर्टवर रोजगार मिळायचा पण आता तेही उदोगपतींना देत आहेत. सरकारी कंपन्यात कंत्राटी पद्धत सुरू आहे. बेरोजगारी वाढली आहे तरुणांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात पण योग्य धोरणं नाहीत. चरा महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना आणली,, आपल्याकडून कर म्हणून घेतलेले पैसे आहेत, तेच देत आहेत.  आपल्या सर्वांवर टॅक्स वाढला, उद्योपतींवर नाही, कर्ज माफ केले नाही. शेतकरी अडचणीत आहेत, सोयाबीनला भाव मिळत नाही, असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.