मुंबईकरांना आर्थिक फटका, महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करवाढीचे संकेत

मुंबईकरांना मोठी आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता कर वाढू शकतो,  तसे संकेत महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. मालमत्ता करामध्ये 15 टक्के वाढ होऊ शकते. 

मुंबईकरांना आर्थिक फटका, महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करवाढीचे संकेत
मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 9:13 PM

मुंबई : मुंबईकरांना मोठी आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीनंतर (Municipal elections) मालमत्ता कर वाढू शकतो,  तसे संकेत महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत. मालमत्ता करामध्ये (Property Tax) 15 टक्के वाढ होऊ शकते.  दर पाच वर्षांनी मालमत्ता करात नियमानुसार वाढ होते.  2020-21 मध्येही वाढ अपेक्षीत होती. परंतु कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. मात्र आता हळूहळू कोरोनाचे सावट कमी होत आहे. पुन्हा एकदा आर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने यंदा मालमत्ता करात वाढ होऊ शकते. महापालिका निवडणूक झाल्यानंतर यासंबंधिचा निर्णय घेण्यात येणार असून, ही करवाढ पुढील तीन वर्षांसाठी राहणार आहे. 15 टक्के वाढ झाल्यास मुंबईकरांना मालमत्ता करापोटी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. याचा आर्थिक फटका नागरिकांना बसणार आहे.

घट भरून काढण्यासाठी निर्णय

2021 – 22 मध्ये मालमत्ता करातून उत्पन्न हे 7 हजार कोटी रूपये अंदाजित केले होते, पण ते कमी करून 4800 कोटींवर आणले गेले आहे. मात्र दुसरीकडे 2022 – 23 मध्ये मालमत्ता करातून सात हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता करातून 100 टक्के सूट देण्यात आल्याने मालमत्ता करात 462 कोटींची घट झाली आहे. ही सर्व घट भरून काढण्यासाठी आणि मालमत्ता कराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्यात येऊ शकते, असे महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्यांना आर्थिक फटका

दरम्यान महापालिकेने कर  वाढवल्यास या कराचा मोठा बोजा हा सामान्य नागरिकांवर पडण्याची शक्यता आहे. राज्यावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात अनेकांनी रोजगार गमावले आहेत. अशा स्थितीमध्ये मालमत्ता कर वाढवल्यास त्याचा फटका हा सर्वसामान्य मुंबईकरांना बसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कर वाढवण्याच्या निर्णयास विरोध होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

‘एसआरए’बाबत मोठा निर्णय, निष्कासित झोपडी तीन वर्षांनी विकता येणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती

‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

Maha Awas Yojana: मार्चपर्यंत 5 लाख घरे बांधणार, राज्य सरकारचे महाआवास अभियान 2.0 सुरू; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.