Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?

नाशिकमध्ये आगामी काळात महापालिका निवडणूक आहे. त्या दृष्टीने साऱ्याच राजकीय पक्षांची पावले पडत आहेत.

Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:32 AM

नाशिकः मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे जोरदार वारे वहात आहे. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतलाय. महापालिका आयुक्तांकडील बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तर दुसरीकडे महापौर सतीश कुलकर्णी यांनीही हा निर्णय घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादीची मागणी

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटांच्या सदनिकांची घरपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली. नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे 4 लाख 55 मिळकती असून, त्यातील पाचशे फुटांपर्यंतच्या सदनिकांमध्ये मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्यास आहे. कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक व्यवस्था बिकट बनली असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देण्याकरिता या सदनिकांची घरपट्टी माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडील बैठकीत सदरच्या विषयावर सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

महापौरांची तयारी

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आता भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा लोकप्रिय निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री मुंबईसाठी असा निर्णय घेऊ शकतात, तर नाशिकसाठीही ते पुढाकार घेतील म्हणत महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिकमध्येही हा निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेने 2021-22 आर्थिक वर्षात घरपट्टीतून 150 कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 107 कोटींची वसुली झालीय. त्यात मागील थकबाकी 400 कोटींवर गेलीय. नाशिक महापालिका हद्दीत 4 लाख 55 हजार मिळकतीयत. त्यात पाचशे चौरस फुटापर्यंत बहुतांश मध्यवर्गीय आहेत. मात्र, एकीकडे नाशिक महापालिकेची जकात रद्द झाल्यानंतर घरपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. तीच रद्द केल्यानंतर कसे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने पावले

नाशिकमध्ये फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक होत आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येत आहे. त्या दृष्टीने साऱ्याच राजकीय पक्षांची पावले पडत आहेत.

इतर बातम्याः

Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा

Nashik| शिष्यवृत्ती अर्जासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत; सहाय्यक आयुक्तांची माहिती, कसा कराल अर्ज…?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.