Corona Effect | पुण्यात अमृततुल्य चहाची दुकान दोन दिवस बंद, दारु विक्रीवरही 31 मार्चपर्यंत बंदी
पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मद्य विक्री बदं ठेवली जाणार (Corona Effect Alcohol Shop Close) आहे.
पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे (Corona Effect Alcohol Shop Close) आवाहन केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मॉल, दुकाने, मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत दारुची सर्व दुकाने बंद ठेण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, “पुणे महानगरपालिका (Corona Effect Alcohol Shop Close) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकित हॉटले वगळून) या ठिकाणी मद्य विक्री बदं ठेवली जाणार आहे. आज (18 मार्च) ते 31 मार्चपर्यंत पूर्ण दिवस ही मद्यविक्री बंद ठेवली जाणार आहे.”
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र महानिषेध अधिनियमन 1949 आणि त्याअंर्तगत कलम आणि नियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे या आदेशात म्हटलं आहे.
पुण्यात अमृततुल्य चहाची दुकान बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर गर्दी टाळण्यासाठी अमृततुल्य असोसिएशनने पुण्यातील सर्व अमृततुल्य चहाची दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 19 आणि 20 मार्चला पुण्यातील सर्व अमृततुल्य चहाची दुकान बंद राहणार आहेत.
ठाण्यात पब, डिस्को बंद
ठाण्यात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.तसेच तंबाखू आणि तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इत्यादी पुढील आदेशापर्यत बंद ठेवावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
नागपुरात तीन दिवस दुकान बंद
तर नागपुरात पुढील तीन दिवस दुकान बंद ठेवण्यात येणार आहेत. चहाची टपरी, चायनीज सेंटर, पान टपरी आणि खाद्य पदार्थांचे दुकानं बंद करा असे नागपूर पोलिसांतर्फे आवाहन केलं जात आहे. तसेच पोलिसांच्या विविध गस्ती पथकाकडून ठिकठिकाणी जाहीर आवाहन केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारसह पोलिसांतर्फे विविध उपाययोजना केल्या आहे.
यवतमाळमध्ये काही बस रद्द
यवतमाळ शहरातील सर्व हॉटेल आणि बार रात्री 8 पासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र, महागाव बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर शहरातील सर्व पानटपरी, खर्रा सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच अनेक बसचे सर्व शेड्युल रद्द करण्यात येणार आहे. तर बस स्थानकावरील गर्दीही ओसरली आहे.
Corona Effect | मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार 31 मार्चपर्यंत बंद, मुंबई पोलिसांचे आदेश
विशेष म्हणजे यवतमाळ मधील माजी नगरसेवक जयदीप सानप यांचे बंधू अॅड लक्ष्मीकांत सानप याचा विवाह घरगुती पद्धतीने उद्या करण्यात येणार आहे.
मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार बंद
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत आहेत. त्यानुसार 31 मार्चपर्यंत मुंबईतील सर्व डिस्कोथेक्स, ऑर्केस्टा, पब, डान्सबार बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश काढला (Corona Effect Alcohol Shop Close) आहे.
संबंधित बातम्या :
Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!
कोरोना खबरदारी : सलून बंद ते देऊळ बंद, पुण्यात काय काय बंद?
Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?