पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार

सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. (सौजन्यःगुगल)
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:15 AM

पुणेः सध्या महापालिका निवडणुकीचा हंगाम आहे. ओबीसी आरक्षणामुळे तूर्तास दोन-तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या जातीलही. मात्र, हा वेळ राजकीय तयारीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. तेच ध्यानात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रविवारी 13 मार्च रोजी पुण्यात (Pune) उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते एक, दोन, तीन नव्हे तर चक्क 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण अजित दादांच्या हस्ते होणार आहे. अगदी सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवशी अजितदादा काय बोलणार याकडे आत्तापासूनच लक्ष लागले आहे. सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

फडणवीसांचेही कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी पुण्यात कार्यक्रम आहेतच. सोबत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याही हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. हे दोन्ही दिग्गज एकाच दिवशी पुण्यात असल्यामुळे ते काय बोलतात, एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतात का, हे पाहावे लागले. काहीही असो. मात्र, पुण्यात होळी आधीच रविवारी राजकीय धुळवड रंगलेली पाहायला मिळणार आहे.

लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश झाल्यामुळे जागा आणि मतदारांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे या गावांचा कौल ज्या पक्षासोबत राहणार तो पक्ष महापालिकेच्या सत्तास्थानी बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकाचे सारे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका या तीन ते चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

असे आहे पक्षीय बलाबल

– भाजप – 99 – राष्ट्रवादी – 42 – काँग्रेस – 10 – शिवसेना – 10 – मनसे – 2 – एमआयएम – 1 – एकूण जागा – 164

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.