AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या लेकीचं ट्रकवर नाव तिच्याच अंगावरुन ट्रक चालवला, दोन्ही मुलींना संपवणाऱ्या बापाचीही आत्महत्या, महाराष्ट्र हादरला

बापाने आपली मुलगी एका तरुणाशी बोलते याचा राग धरत पोटच्या दोन्ही मुलींना ठार केलं आहे. (pune maval father daughter murder)

ज्या लेकीचं ट्रकवर नाव तिच्याच अंगावरुन ट्रक चालवला, दोन्ही मुलींना संपवणाऱ्या बापाचीही आत्महत्या, महाराष्ट्र हादरला
DAUGHTER MURDER
| Updated on: Apr 18, 2021 | 9:03 PM
Share

पुणे : मुलगी व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्यातरी मुलाशी चॅटिंग करत असल्यामुळे एका माथेफिरु बापाने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. या बापाने आपली मुलगी एका मुलाशी बोलते याचा राग धरत पोटच्या दोन्ही मुलींना ठार केलं आहे. मुलींना चालत्या ट्रकसमोर झोपवत या निर्दयी बापाने त्यांच्या अंगावरुन ट्रक घातला आहे. हा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील इंदोरी गावात घडलाय. आपल्या दोन मुलींचा जीव घेत या बापाने स्वत:लासुद्धा संपवलं आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे मावळ तालुका तसेच पुणे जिल्हा सुन्न झालाय. (Pune Maval father murdered his Two daughters after knowing affair of his elder daughter)

दोन्ही मुलींच्या अंगावर ट्रक घातला

मिळालेल्या माहितीनुसार, भरत ज्ञानदेव भराटे याची एक मुलगी कोणत्यातरी एका मुलाला व्हॉट्सअ‌ॅपवर चॅटिंग करायची. हा प्रकार समजल्यानंतर भरत भराटे याला राग अनावर झाला. भराटे याने थेट नंदिनी भराटे आणि वैष्णवी भराटे या दोन्ही पोटच्या मुलींना ट्रकखाली झोपवले. तसेच त्यांच्या अंगावरुन ट्रक घातला. या घटनेत या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. तसेच मुलींच्या अंगावर ट्रक घालून भरत फराटे यानेसुद्धा चालत्या ट्रकखाली उडी घेत स्वत:ला संपवलं आहे.

मावळ तालुका हादरला

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर इंदोरी गावासह संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. आपली मुलगी एका मुलाला फक्त व्हॉट्सअ‌ॅपवर बोलते याचा राग मनात धरून आपल्या मुलीला संपवल्यामुळे या निर्दयी बापाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या :

मध्यरात्री भर रस्त्यात कॅब थांबवली, गाडीत बसताच चाकूचा धाक, मोबाईल-पैसे हिसकावले, सुदैवाने पोलिसांची एन्ट्री

तीन राज्यांमध्ये दहशत माजवणारा गुंड, सलमान खानलाही धमकी, कुख्यात आरोपीची दिल्ली सेल चौकशी करणार, पण…

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

(Pune Maval father murdered his Two daughters after knowing affair of his elder daughter)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.