Pune Mini Lockdown : पुण्यातील विकेंड लॉकडाऊन संपला तरी निर्बंध कायम, काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

विकेंड लॉकडाऊन संपला असला तर पुण्यात कठोर निर्बंध कायम आहे. पुणे महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील अशी घोषणा यापूर्वीच केली आहे.

Pune Mini Lockdown : पुण्यातील विकेंड लॉकडाऊन संपला तरी निर्बंध कायम, काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडू नका
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 6:15 PM

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बं लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवारी पहिला विकेंड लॉकडाऊन पार पडला. या दोन दिवसांत विविध शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. पुण्यातही शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन पाळण्यात आला. आज हा विकेंड लॉकडाऊन संपला असला तर पुण्यात कठोर निर्बंध कायम आहे. पुणे महापालिका आणि स्थानिक प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील अशी घोषणा यापूर्वीच केली आहे. (Weekend lockdown over, strict restrictions in Pune till April 30)

पुण्यातील विकेंड लॉकडाऊन आज सकाळी 7 वाजता संपला असला तरी संध्याकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहेत. हे आदेश सोमवार ते शुक्रवार लागू असणार आहेत.

पुण्यात काय सुरु राहणार?

  • जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
  • हॉटेलमार्फत फक्त पार्सल सेवा सुरु
  • सर्व भाजी मंडई आणि दूध
  • मेडिकल, आरोग्यविषयक यंत्रणा
  • उत्पादन क्षेत्रातील सर्व उद्योग
  • खाद्यपदार्थ विक्री स्टॉल, टपऱ्यांकडून पार्सल सेवा
  • राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बससेवा, विमान प्रवास
  • ऑनलाईन शिक्षण
  • प्रसारमाध्यमं, वृत्तपत्र छपाई आणि वितरण
  • सर्व बँका, विद्युत कंपन्या, आयटी कंपन्या, वकील, सनदी लेखापालांची कार्यालये
  • आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जाहीर अत्यावश्यक सेवा

काय बंद राहणार?

  • जीवनावश्यक आणि अत्यावश्य सेवा वगळता सर्व दुकाने
  • शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस
  • पीएमपीएमएल बससेवा
  • हॉटेल, बिअर बार, रेस्टॉरंट्स
  • मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बागा, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, क्रीडा संकुल, स्पा सेंटर, सलून, ब्यूटी पार्लर, केश कर्तनालय, फूड मॉल, आठवडी बाजार
  • सर्व धार्मिकस्थळं
  • सरकारी, सामाजिक, राजकीय कार्यक्रम, सभा

भाजपचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटणार

दरम्यान, पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेणार आहे. शहरातील वाढत्या कोरोनाच्या संकटात नागरिकांना योग्य आणि पुरेशा आरोग्य सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी भाजपचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आणि अन्य लोकप्रतिनिधी असतील.

संबंधित बातम्या :

Pune Corona ground report : पुण्यात सक्रिय रुग्ण 52 हजार, ऑक्सिजन बेड 45, ICU बेड शून्य

पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार, पाच हजार इंजेक्शन रवाना

Weekend lockdown over, strict restrictions in Pune till April 30

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.