दुधाचा टँकर उलटून 50 फूट फरफटत, पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर थरार, एकाचा जागीच मृत्यू
यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर बोर घाटात दुधाचा टँकर पलटी झाला. या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला.
पुणे : यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर बोर घाटात दुधाचा टँकर पलटी झाला. या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. (Pune mumbai Express Way Tanker accident)
खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन जवळपास 50 फूट फरफटत गेला. या अपघातात मुंबईतील बाळासाहेब खोपडे या माथाडी कामगारांचा मृत्यू झालाय.
यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाटात दुधाचा टँकर पलटी, एक जण ठार pic.twitter.com/TSPTYGueL2
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
टँकर पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन काही काळ बंद करण्यात आली होती. यावेळी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल होऊन त्यांमी एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी हटवत टँकर बाजूला केला.
(Pune mumbai Express Way Tanker accident)
संबंधित बातम्या
Road Accident: ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू तर 17 जखमी
ऐन दिवाळीत पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच गमावले प्राण