पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद!

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहेत. आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे.

पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद!
ऑनलाईन शिक्षण
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 9:22 AM

पुणे: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे पालक शाळांचे शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी पुणे आणि पिंपरीतील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे. (Online education is closed by private english schools)

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कुणाचा पगार अर्धा झाला. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शाळांचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिक्षकांचे पगार देण्यासही शाळांकडे पैसा नाही. अशा स्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहेत. आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केली आहे.

पालक आक्रमक

कोरोनाच्या काळात शाळा बंद करण्यात आलेल्या असून, शाळांनी पालकांकडे फीचा तगादा लावला आहे. पुण्यात फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केलं जाणार आहे. यासंदर्भात पालिकेच्या शिक्षण मंडळात शनिवारी सुनावणी पार पडली. शिक्षण संचालकांसमोर पालकांनी शाळांविरोधातल्या तक्रारींचा पाढा वाचला. पालकांनी फी कमी करण्याची मागणी केली असून, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. शिक्षण संचालकांच्या सुनावणीत पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

पुणे महापालिकेच्या शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

दुसरीकडे पुणे महानगरपालिकेतील सर्व शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग आणि पालकांचा हमीपत्राला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी-चिंचवडमध्येही 3 जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. तिथल्या महापालिका प्रशासनाचा हा निर्णय आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद होणार; शिक्षण संचालकांच्या सुनावणीत पालक आक्रमक

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

Online education is closed by private english schools

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.