14 वर्षाच्या मुलास खेळत असताना आला ह्रदयविकाराचा झटका, मग आता सुरु झाली ही चर्चा

heart attack : पुणे शहरात 14 वर्षीय मुलास हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत त्याचे प्राण वाचू शकले नाही. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेले आहे. आता पुणे पोलीस 14 वर्षाच्या मुलास ह्रदयविकार येऊ शकतो का? याची तपासणी करणार आहे.

14 वर्षाच्या मुलास खेळत असताना आला ह्रदयविकाराचा झटका, मग आता सुरु झाली ही चर्चा
heart attack
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 11:03 AM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात एका 14 वर्षीय मुलगा खेळत होता. खेळत असताना तो खाली पडला. कोणाला काहीच समजले नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याचे प्राण वाचू शकले नाही. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही गेले आहे. आता पुणे पोलीस 14 वर्षाच्या मुलास ह्रदयविकार येऊ शकतो का? याची तपासणी करणार आहे. या घटनेच्या माध्यमातून नवीन चर्चाही सुरु झाली आहे.

काय घडली घटना

पुणे शहरातील वानवडी भागात वेदांत धामणगावकर हा १४ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळत असताना अचानक वेदांतच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. तो जमिनीवर पडला. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. लगेच मित्रांनी ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुन्हा मोठ्या रुग्णालयात रेफर केले. मग फातिमा नगर येथील खासगी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मुलाचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मुलाची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळेच येथे आल्यानंतर त्याचा अकाली मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी सुरु केला तपास

रुग्णालयातून घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नातेवाईक आणि डॉक्टरांकडे चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या परिस्थितीत एवढ्या लहान मुलास ह्रदयविकार येऊ शकतो का? त्याची अशी परिस्थिती का आणि कशी घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी मुलासोबत खेळणाऱ्या इतर मुलांकडे पोलीस चौकशी करणार आहे. ह्रदयविकार झटका कोणालाही येऊ शकतो, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

जीवनशैलीत झाला बदल

चुकीची आहार पद्धती, बदललेली जीवनशैली, व्यायाम न केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जाते. मग १४ वर्षाच्या मुलाबाबत असा प्रकार घडावा, हे आश्चर्य आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणूस सतत धावत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. यामुळे कोणीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे. अगदी कमी वयामध्ये वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

हे ही वाचा

दांपत्याने पुण्यातील लोकांना तब्बल १६ कोटींत फसवले, वाचा कसे गंडवले शेकडो पुणेकरांना

पुणे शहरातील डॉक्टरासह नऊ जणांची कोट्यवधीत फसवणूक? काय केले नेमके आरोपीने?

पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.