पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अजित पवारांशी बैठक झाल्याचा शहराध्यक्षांचा दावा

पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अजित पवारांशी बैठक झाल्याचा शहराध्यक्षांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवणार
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 7:48 PM

पुणे : पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक (BJP Corporators) राष्ट्रवादीत (NCP)प्रवेश करणार असा खळबळजनक दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्य प्रशांत जगताप यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा झाली असाही दावा जगताप यांनी केला आहे. तसेच या नगरसेवकांची प्रशांत जगताप यांच्याशी बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी केलेल्या या दाव्याने पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसातच पुणे महापालिकेसह इतर मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. प्रशांत जगताप यांचा हा दावा खरा ठरल्यास आगामी निवडणुकीत भाजपची चिंता वाढू शकते, मात्र प्रशांत जगताप यांनी याआधीही असा दावा केला आहे, त्यामुळे हा दावा यावेळी तरी खरा ठरणार की गेल्या वेळेसारख्या फक्त चर्चा रंगणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुण्यात जोर कुणाचा चालणार?

पुणे महापालिका निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी एकीकडे भाजप जोर लावत आहे. भाजपडून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांट पाटील असे अनेक बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुरीकडे राष्ट्रवादी पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी जोर लावत आहे. पुण्यावर अजित पवारांचे विषेश लक्ष नेहमीच राहिले आहे. तर शिवसेनाही आगामी महापालिका निवडणुकीत जोमाने उतरण्याच्या तयारीत आहे. तर मनसेकडून राज ठाकरे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज ठाकरेंनी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात बैठकांचा सपाटा लावताना दिसून येत आहे. तर शिवसेनेकडून पुणे जिंकण्याची जबाबदारी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना देण्यात आली आहे. अशातच जगताप यांनी केलेल्या या दाव्याने भाजपच्या गोटातही खळबळ माजली आहे.

पुण्यात जगतापांचा स्वबळाचा सूर

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठीकडे मांडणार आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल, असेही जगतात यांनी स्पष्ट यावेळी केले.

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचा ‘ऐकला चलो रे चा नारा

Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर

Pune Crime| दौंड गँगरेप प्रकरण ; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, घटनेनंतर अवघ्या काही तासात केली होती अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.