Pune PMPML | पुणे ‘पीएमपीएमएल’चा नवा फंडा यशस्वी, अकरा दिवसांत काय बदल झाला वाचा…

Pune PMPML | पुणे शहरासाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. आता काही मार्गांवर मेट्रोही सुरु झाल्या आहे. परंतु संपूर्ण शहरासाठी बसपर्याय आहे.

Pune PMPML | पुणे 'पीएमपीएमएल'चा नवा फंडा यशस्वी, अकरा दिवसांत काय बदल झाला वाचा...
PMPML BUSImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 12:31 PM

पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो दोन मार्गांवर सुरु झाली आहे. पुणे मेट्रोचा विस्तार वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बस सेवा अधिक चांगली करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) बदल केले जात आहे. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस येत आहे. गुगलवर पीएमपीची बस सध्या कुठे आहे? हे कळणार आहे. त्याचबरोबर पीएमपी बसचे तिकीट ऑनलाईन काढणे सुरु करण्यात आले आहे.

प्रशासनाचा हा फंडा यशस्वी

बसमध्ये तिकीट ऑनलाइन सुविधा सुरु होऊन काही दिवसच झाले आहे. पुणेकरांकडून या सुविधेला चांगलाच प्रतिसाद मिळला आहे. पुणे पीएमपीएमएल बसमध्ये एक ऑक्टोंबरपासून तिकीट युपीआयने काढण्याची सुविधा सुरु झाली. सुरुवातीला यासाठी तांत्रिक अडचणी आल्या. त्यानंतर यूपीआय यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू झाली. त्याचा लाभ अनेक प्रवासी घेत आहेत. त्यामुळे गेल्या अकरा दिवसांत ३५ हजार जणांनी ७८४ युपीआयने तिकीट काढले आहे. त्यातून ७ लाख ७३ हजार २६ रुपये मिळाले आहेत. या अकरा दिवसात २९ हजार ५२५ ट्रान्झॅक्शन झाले आहे.

सुट्या पैशांचा वाद  आता थांबला

बसमध्ये सुट्ट्या पैशांमुळे नेहमी वाहक आणि प्रवाशांमध्ये होत होत असतात. परंतु आता युपीआयने तिकीट सुरु झाल्यानंतर हा वाद थांबला आहे. पीएमपीएमएलच्या बसमध्ये यूपीआय यंत्रणा एक ऑक्टोंबरपासून सुरु झाली. त्यानंतर ११ दिवसांत सात लाख ७३ हजार रुपयांचे उत्पन्न ‘क्यूआर कोड’द्वारे मिळाले असल्याची माहिती पीएमपीएमएलकडून देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

बसचे लोकेशन  लवकरच समजणार

पीएमपीएमएलची बस कुठे आहे हे आता गुगलवर समजणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने यासाठी गुगुलसोबत करार केला आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी १४ पीएमपीएमएलच्या बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहेत. त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. या चाचणीचा अहवाल आता येणार असून त्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....